
[ad_1]
अरुंधती अनिरुद्धला म्हणते की, तुम्ही किंवा कुणीही काहीही करुदे पण आता आम्ही कधीच वेगळे होऊ शकत नाही. या मंगळसूत्रामुळे काहीच होणार नाही, कारण आम्ही आधीच मनाने एक झालो आहोत. आता आम्हाला कुणीच वेगळं करू शकत नाही. आशुतोष आणि अरुंधतीचे लग्न होऊ नये, यासाठी अनिरुद्ध वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, त्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. अरुंधतीच्या लग्नाच्या विषयामुळे देशमुख कुटुंबात आता चांगलाच गदारोळ माजला आहे. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न मोडावं, म्हणून अनिरुद्ध नवनव्या शकला लढवताना दिसत आहे.
[ad_2]
Source link
