Tuesday, September 15, 2026
Homeसाताराकामगारांचे खरे तारणहार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

कामगारांचे खरे तारणहार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

साहस टाईम्स :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण सर्वजण संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो, पण त्यांचे कामगार कल्याणासाठीचे योगदान देखील अतुलनीय आहे. देशाचे पहिले कामगार मंत्री म्हणून त्यांनी कामगारांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले.

डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांसाठी खालील महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या:

  • कामाचे तास १२ वरून ८ तासांवर आणले.
  • सर्व कामगारांना पीएफ योजना लागू केली.
  • भरपगारी सुट्टीची तरतूद केली.
  • वेतन आयोग लागू केला.
  • पेन्शन योजना सुरू केली.
  • सीएल (C.L.), ईएल (E.L.), पीएचएल (P.H.L.) सर्वांना लागू केली.
  • कर्मचारी मृत्यू झाल्यास वारसास नोकरीची तरतूद केली.
  • ईएसआयसी (ESIC) योजना लागू केली.
  • आठवड्याला एक दिवस सक्तीची सुट्टी लागू केली.
  • महिलांसाठी भरपगारी प्रसूती रजा लागू केली.

या सर्व योजना आजही देशातील कोट्यवधी कामगारांच्या आयुष्याला आधार देत आहेत. बाबासाहेबांनी केलेले हे कार्य त्यांना फक्त संविधान निर्माता नव्हे, तर कामगारांचा खरा तारणहार बनवते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments