Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रघरी लवकर जाण्याची ओढ, खच्चून भरलेल्या लोकलमध्ये चढली, दारात उभी असताना हात...

घरी लवकर जाण्याची ओढ, खच्चून भरलेल्या लोकलमध्ये चढली, दारात उभी असताना हात सटकला अन्…

[ad_1]

Mumbai News: मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान कर्जत लोकलमधून पडून एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मंगळवारी (२२ ऑक्टोबर २०२४) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळच्या सुमारास जवळपास सर्वच लोकल गाड्या कल्याणहून कर्जत आणि कसाराच्या दिशेने उशिराने धावतात. त्यामुळे घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची लोकलमध्ये गर्दी होती. पाय ठेवायलाही जागा नसताना संबंधित महिला लोकलमध्ये चढली. दाराजवळ उभी असताना तिचा हात सटकला आणि ती खाली पडली. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ महिलेला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments