Tuesday, September 15, 2026
Homeसाताराप्रभातफेरीतून फलटण मतदारसंघात मतदान जनजागृतीची मोहिम

प्रभातफेरीतून फलटण मतदारसंघात मतदान जनजागृतीची मोहिम


फलटण :     विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत स्वीप उपक्रमांतर्गत फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघात दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी तहसील कार्यालय फलटण येथून सकाळी ९ वाजता प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीतून महात्मा फुले चौक, गजानन चौक, उमाजी नाईक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, डीएड चौक, गिरवी नाका ते तहसील कार्यालय असा मार्गक्रमण करण्यात आले.

यावेळी “मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, आपले मत आपले भविष्य” अशी घोषवाक्य देऊन मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रभातफेरीत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

तहसीलदार व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित जाधव यांनी मतदारांना २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. मतदार जनजागृती प्रभातफेरी व रॅलीचे नियोजन नोडल स्वीप अधिकारी सचिन जाधव आणि त्यांच्या टीममार्फत करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थीही उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments