Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रPune Traffic update : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! गणेशखिंड मार्गावरील...

Pune Traffic update : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! गणेशखिंड मार्गावरील दुहेरी वाहतूक आजपासून सुरू

[ad_1]

पुणे विद्यापीठ ते सिमला चौक मार्ग हा पुण्यातील महत्वाचा मार्ग आहे. हा मार्ग पाषाण, बानेर औंधला जोडतो. तसेच मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी देखील या मार्गांचा प्रामुख्याने वापर होतो. शिवाय हिंजवडी येथे कामासाठी जाणाऱ्या आयटी अभियंत्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र, या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक वैतागले होते. या मार्गावर राजभवन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, कॉसमॉस टॉवर, ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स, राहुल टॉकिज, मोदीबाग, एलआयसी, सवाई गंधर्व स्मारक, पॉलिटेक्निक कॉलेज, कृषी महाविद्यालय, आकाशवाणी, आदि महत्वाचे ऑफिस देखील आहेत. येथे जाणाऱ्यांना ट्रॅफिकमुळे वैताग यायचा. आता या मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याने या मार्गावरील कोंडी सुटणार का ? हे पहावे लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments