
– गेल्या काही दिवसांत राज्यात जातीवरून एकमेकांबद्दल मनं कलुषित मराठा व ओबीसी एकमेकांशी व्यवहारही करेनासे झाले आहेत.
– राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेणं ही त्यांची जबाबदारी.
– मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरून मराठवाडा पेटलेला असताना तो शांत करण्यासाठी सत्तेचा विचार न करता त्यांनी घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाची आठवण करून दिली.
– परंतु सध्याच्या या अशांततेच्या परिस्थितीत मात्र आपला कोणताही पुढाकार दिसत नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. यावर त्यांनी मराठा किंवा ओबीसी उपोषणकर्त्यांना सरकारने काय आश्वासने दिली, याची काहीच कल्पना नसल्याचे सांगितले.
– राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गावागावात काय परिस्थिती आहे, याबद्दल त्यांचा अभ्यास अधिक आहे. त्यामुळे आपण पुढाकार घेतला पाहिजे, अशी विनंती त्यांना केली.




