Amravati City | “अमरावतीच होणार आंध्र प्रदेशची राजधानी”, चंद्राबाबू नायडूंची मोठी घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
Amravati City | “अमरावतीच होणार आंध्र प्रदेशची राजधानी”, चंद्राबाबू नायडूंची मोठी घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)


“अमरावतीच होणार आंध्र प्रदेशची राजधानी”, चंद्राबाबू नायडूंची मोठी घोषणा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या एक दिवस आधी, तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे.

एन चंद्राबाबू नायडू पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमरावतीच्या थांबवलेल्या विकासाला चालना मिळाली आहे. विभाजनाच्या 10 वर्षानंतर देखील राजधानीचे भवितव्य आणि भौगोलिक स्थान कायम होते. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 1 मार्च 2014 नुसार 2 जून 2024 पासून हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी असेल. यावेळी एनडीएच्या बैठकीत एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये तीन राजधान्यांच्या नावाखाली खेळ होणार नाही. अमरावतीच होणार आंध्र प्रदेशची राजधानी… असं यावेळी म्हणाले.

अमरावती ही राज्याची एकमेव राजधानी असेल. टीडीपी, भाजप आणि जनसेनेच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीला नायडू संबोधित करत होते. बैठकीत त्यांची आंध्र प्रदेश विधानसभेतील एनडीए नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तसेच आमच्या सरकारमध्ये तीन राजधान्यांच्या नावाखाली खेळ होणार नाही. आमची राजधानी अमरावती आहे. राज्याच्या विभाजनानंतर अमरावती ही राजधानी आहे. 2014 ते 2019 या काळात ते मुख्यमंत्री होते. नायडू यांनी अमरावतीला राजधानी बनवण्याची कल्पना मांडली होती.






Source link