Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशNarendra Modi Oath Ceremony | शपथविधी सोहळा पार ! पुण्याचे खासदार मुरलीधर...

Narendra Modi Oath Ceremony | शपथविधी सोहळा पार ! पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

शपथविधी सोहळा पार ! पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन येथे पार पडला. यावेळी पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली.

दिल्ली : राष्ट्रपती भवन येथे एनडीए सरकारचा तिसरा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र ‌मोदी यांनी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक केली. यावेळी पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान देण्यात आले आहे. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळाले. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी भाजपचा पुण्याचा गड राखण्याचे काम केले. त्यांनी सार्थ करुन दाखवलेल्या या विश्वासानंतर केंद्राने देखील त्यांना मोठी संधी दिली आहे. मुरलीधर मोहोळ यांना भाजची पश्चिम महाराष्ट्राची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. एकूण राज्यातील राजकीय गणिते लक्षात घेत भाजपने मंत्रीपदाचे वाटप केले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments