फलटण येथील गजानन चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार  धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा

0
27
फलटण येथील गजानन चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार  धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा

फलटण : माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण येथील गजानन चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची  भव्य जाहीर सभेचे आयोजन हे श्रीमंत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते या सभेत खा शरद पवार यांनी फलटण तालुक्यातील नागरीकांच्या पाठीशी बारामतीकर खंबीरपणे उभे राहतील असे सांगत भाजपावर निशाणा साधला देशाची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेने सुरु आहे . या देशात संविधानाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणली . ही लोकशाही नेस्तनाबुत करुन संविधान बदलण्याची भाषा भाजपा करु पहात आहे . मतदारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीचा वापर करुन संविधान बदलू पाहणा-या भाजपाला घरी पाठवावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांनी केले .

खा शरद पवार म्हणाले , फलटणच्या राजघराण्याला मोठा वारसा आहे . मालोजीराजे , रामराजे , संजीवराजे यांनी फलटण तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे . परंतु अलिकडच्या काळात काही प्रवृत्तीच्या लोकांनी फलटण तालुक्यातील लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे ती येथील जनता कधीच सहन करणार नाही . अशा प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी फलटणकरांच्या पाठीशी बारामतीकर खंबीरपणे उभा राहतील असा विश्वास त्यानी दिला .

खा पवार यांनी भाजप नेतृत्वावर व त्यांच्या हुकूमशाही पध्दतीवर जोरदार हल्ला चढविला . ते म्हणाले , या देशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देशाचे संविधान तयार करण्यात आले . या संविधानामुळे श्रीमंत असो की गरीब या सर्वाना मताचा समान अधिकार दिला . परंतु हे संविधान बदलण्याची भाषा भाजप करीत आहे . ही संसदीय लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आता मतदारांच्या हाती आहे . मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व त्यांना विजयी करावे असे आवाहन केले .

धैर्यशील मोहिते पाटील यांनी नीरा – देवधर धरणाच्या पाण्यासाठी विजयदादा व रामराजे यांनी प्रयत्न केल्याचे सांगून काही लोक फुकटचे श्रेय घेवून पाणीदार – जलनायक अशी बिरुदावली लावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत . परंतु आपण खासदार झाल्यावर शेतक-यांच्या शेतीला पाणी देवून त्यांना पाणीदार शेतकरी बनवू असे सांगितले .

रघूनाथराजे नाईक निंबाळकर यांनी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर चौफेर टिका करीत त्यांच्यामुळेच सुसंस्कृत फलटणमध्ये गुंडगीरी वाढली . या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य द्यावे असे आवाहन केले .

या जाहिर सभेस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , सातारा जिल्हा राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विजयालक्ष्मी नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईक निंबाळकर, माजी उपसभापती चेतन शिंदे, सौ प्रतिभा शिंदे, बजरंग खटके , राजाभाऊ निकम , राष्ट्रवादीचे प्रवक्ते शंभू खलाटे ,आम आदमी पक्षाचे धैर्यशील लोखंडे , विजयराव भगत यांच्यासह हजारो नागरीक उपस्थित होते