रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम

0
2
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम

बिजवडी, ता. माण (प्रतिनिधी) : “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद!” या ध्येयवाक्याने प्रेरित रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी (ता. माण, जि. सातारा) यांनी सन २०२५-२६ च्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कु. श्रेया अमोल कदम हिने २२६ गुण (J-152/220) मिळवत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी म्हणून मानाचे स्थान प्राप्त केले. तसेच कु. सानिका नितीन जठार (१९२ गुण), कु. कार्तिकी संजय भोसले (१९० गुण), कु. समृद्धी हणमंत खरात (१६६ गुण) आणि अद्वेत राजेंद्र इंगळे (१६२ गुण) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कु. सुफिया समीर आतार (१६६ गुण), कु. गीतांजली दादासो भोसले (१४० गुण), कु. स्वरा स्वागत जगदाळे (१३४ गुण) आणि महेश सुधीर भोसले (१२४ गुण) यांनी यश मिळवत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. श्री. हणमंतराव भोसले, स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, पालक तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, या यशामागे माननीय मुख्याध्यापक श्री. शिर्के आर. एस., शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, योग्य मार्गदर्शन व अभ्यासातील चिकाटी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या यशामुळे विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.