Tuesday, November 24, 2026
Homeफलटणफलटण तालुका कुरवली.बु.सुळ वस्ती (धनगरवाडा) विद्यार्थ्यांचे दीड वर्षांपासून झाडाखालीच शिक्षण.!वर्गखोल्या नसल्याने पालक...

फलटण तालुका कुरवली.बु.सुळ वस्ती (धनगरवाडा) विद्यार्थ्यांचे दीड वर्षांपासून झाडाखालीच शिक्षण.!वर्गखोल्या नसल्याने पालक संतप्त

बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ.वैशाली कांबळे यांच्या पाठपुराव्याने प्रश्न मार्गी!

कुरवली बुद्रुक (धनगरवाडा) : येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या निर्लेखित होऊन दीड वर्षांचा कालावधी उलटला, तरी नवीन वर्गखोल्यांची उभारणी झालेली नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने गेल्या दीड वर्षांपासून झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाच्या दिरंगाईबाबत पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.शाळेच्या वर्गखोल्या निर्लेखित झाल्यानंतर नवीन खोल्या बांधण्याची प्रक्रिया होणे अपेक्षित होते. मात्र, दीड वर्ष उलटूनही विद्यार्थ्यांना हक्काच्या वर्गखोल्या मिळालेल्या नाहीत. परिणामी, चिमुकल्या विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

पालकांनीही आक्रमक भूमिका घेतली असून, शाळेसाठी नवीन वर्गखोल्या उपलब्ध करून न दिल्यास आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या अथवा अन्य शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास पंचायत समिती फलटण कार्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास सुळ आण्णा बाबर ,कैलास सूळ भानुदास सरक ,विजय सुळ, राजेंद्र सूळ, दादा सूळ, भाऊसाहेब सरक, संजय सरक, नितीन बाबर ,अशोक सरक ,अनिल सूळ, भारत आटोळे ,मिलिंद लोंढे ,गणेश सूळ ,लाला सूळ, वैभव सूळ, संजय सरक माजी सरपंच व आबा सरक हे उपस्थित होते.

सदरचा विषय बरड जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशाली कांबळे यांना समजल्या नंतर त्यांनी हा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे व सातारा जिल्हा परिषद शिक्षण सभापती सौ .तेजस्विनी कदम,जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी,यांच्या बरोबर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला असून आगामी 2 महिन्यात नवीन शाळा खोल्या उभ्या राहणार आहेत.

यावेळी त्यांचे बरोबर फलटण पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सी जी मठपती यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments