Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशवेश्यालयात मध्यरात्री लागली भीषण आग! बघ्यांनी केली गर्दी; समोर आला धक्कादायक Video

वेश्यालयात मध्यरात्री लागली भीषण आग! बघ्यांनी केली गर्दी; समोर आला धक्कादायक Video

[ad_1]

Video Brothel Fire In Delhi: नवी दिल्लीमधील जीबी रोड परिसरामध्ये सोमवार आणि रविवारच्या मध्यरात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका वेश्यालयामध्ये भीषण आग लागली. रेड लाईट एरियामधील या इमारतीला रात्री अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 

पोलिसांची घटनास्थळी धाव

आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी रात्री उशीरा आग लागल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. या आगीचं स्वरुप एवढं मोठं होतं की ती विजवण्यासाठी अग्निशामनदलाच्या 14 गाड्यांना पाचारण करण्यात आलं. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, काही वेळातच आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. 

स्थानिकांची गर्दी

आग लागल्यानंतर स्थानिक या इमारतीजवळ गोळा झाले. उपस्थितांपैकी अनेकजण मोबाईलवर आगीची दृष्य कैद करत होते. या इमारतीच्या बाजूलाच असलेल्या इमारतीच्या बाल्कनीमधून काही व्यक्ती वाकून ही आग बघत असल्याचंही एएनआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओत दिसथ आहे. 

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

“जीबी रोड परिसरामधील वेश्यालयामध्ये काल रात्री आग लागली. या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. सोमवारी रात्री उशीरा यासंदर्भातील माहिती फोनवरुन मिळाली असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांना माहिती समजल्यानंतर 14 फायरब्रिगेड इंजिन घटनास्थळी आग विजवण्यासाठी पाठवण्यात आले. थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं. सध्या पोलीस या आगीचं कारण शोधत आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे,” असं एएनआयने म्हटलं आहे. 

स्थानिकांची काढला व्हिडीओ

वेश्यालयाला आग लागलेल्या घटनेचा जो व्हिडीओ एएनआयने पोस्ट केला आहे तो एका स्थानिकाने शूट केला असून हा व्हिडीओ घटनास्थळावरील असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या आगीमध्ये किती वित्तहानी झाली यासंदर्भातील पंचनामाही सुरु असून लवकरच याबद्दलचा तपशील समोर येईल असं सांगितलं जात आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments