
Walchandnagar Industries worker protest : भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान, गगनयान, मंगळयान, सुर्ययानासारख्या मोहिमेची महत्वाची उपकरणे तयार करणाऱ्या वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीतील ६३० कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. पगारवाढीच्या मागणीसाठी २० दिवसापासुन कंपनीचे कामगार संपावर गेले आहे. दरम्यान, कंपनीचे व्यवस्थापन दुजाभाव करीत असल्याचा आरोप करत कामगारांनी अर्धनग्न आंदोलन करुन निषेध केला.






