Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रलोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयाच्या समृद्धी नरुटेचे तिहेरी यश; भाग्यश्री क्षीरसागरचे दुहेरी यश!

लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयाच्या समृद्धी नरुटेचे तिहेरी यश; भाग्यश्री क्षीरसागरचे दुहेरी यश!

लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयाच्या समृद्धी नरुटेचे तिहेरी यश; भाग्यश्री क्षीरसागरचे दुहेरी यश!

बोराटवाडी : तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी, बावडा संचलित लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोराटवाडी येथील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कु. समृद्धी दयानंद नरुटे हिने १७ वर्षांखालील वयोगटात तीन क्रीडा प्रकारांत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तिहेरी यश संपादन केले, तर कु. भाग्यश्री विजय क्षीरसागर हिने १९ वर्षांखालील वयोगटात दोन क्रीडा प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले आहे.

कु. समृद्धी दयानंद नरुटे हिने १७ वर्षांखालील वयोगटात थाळीफेक, गोळाफेक आणि भालाफेक या तिन्ही क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी भर पडली आहे.

तसेच कु. भाग्यश्री विजय क्षीरसागर हिने १९ वर्षांखालील वयोगटात भालाफेक आणि थाळीफेक या दोन्ही क्रीडा प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळवून आपली क्रीडाक्षमता सिद्ध केली. दोन्ही विद्यार्थिनींनी सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

या यशस्वी कामगिरीसाठी विद्यार्थिनींना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. सदाशिव सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी नियमित सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली. योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थिनींना तालुकास्तरावर यश मिळवता आले.

या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत कोकाटे सर यांनी माहिती दिली. विद्यार्थिनींच्या या कामगिरीमुळे विद्यालयासह बोराटवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री मा. श्री. हर्षवर्धन पाटील, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक श्री. उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष श्री. मनोजराव पाटील, मा. सचिव श्री. किरणराव पाटील, खजिनदार श्री. उमेश सूर्यवंशी तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी हार्दिक अभिनंदन केले. ग्रामस्थ व पालकांनीही विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

क्रीडा क्षेत्रातील या उल्लेखनीय यशामुळे समृद्धी नरुटे आणि भाग्यश्री क्षीरसागर यांनी विद्यालयाचा नावलौकिक वाढवला असून, त्यांच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments