दररोज हजारो नागरिकांना सायबर ठकांचे संशयास्पदफोन, संदेश किंवा व्हॉट्सअॅपवरील लिंक येतात. यापैकीबहुतांश लोक फसवणुकीचे बळी ठरत नाहीत. ते फोनकट करतात किंवा संदेशाकडे दुर्लक्ष करतात. तरीहीअशा फसवणुकीच्या प्रयत्नांची तक्रार करणाऱ्यांचे प्रमाणअंदाजे 5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यामागे अनेक कारणेआहेत. लोकांकडे वेळ नसतो. अनेकांचा यंत्रणांवरविश्वास नसतो. काही जण नोकरशाहीची उदासीनताकिंवा अधिकाऱ्यांच्या नकारात्मक अनुभवांमुळे तक्रारकरण्याचे टाळतात. मात्र याचा परिणाम असा होतो की,सायबर ठगांचा मोबाईल क्रमांक सक्रिय राहतो आणि तोनव्या लोकांना लक्ष्य करत राहतो. नागरिकांची ही शांतता गुन्हेगारांसाठी फायदेशीर ठरते.अधिकाधिक लोकांनी फसवणुकीचा प्रयत्न अयशस्वीझाला तरी त्याची तक्रार नोंदवली, तर सायबर ठगांचेसंपूर्ण जाळे अतिशय लवकर कमकुवत करता येऊशकते. पण प्रश्न असा आहे की, तक्रार कुठे आणि कशीकरायची? चांगली बाब म्हणजे आता तक्रार करण्यासाठी पोलिसठाणे किंवा सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.दूरसंचार विभागाने (डीओटी) विकसित केलेल्या ‘संचारसाथी” या मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोणताहीनागरिक घरबसल्या संशयास्पद मोबाईल क्रमांकाचीतक्रार नोंदवू शकतो. काही मिनिटांतच ही प्रक्रिया सायबरठकाचे सिम कार्ड आणि गरज पडल्यास त्याचा मोबाईलहँडसेटही ब्लॉक करण्यास मदत करू शकते. सायबर फसवणुकीची तांत्रिक प्रक्रिया समजून घेतल्यासलोक वेळेत सावध होऊ शकतात. अनेक प्रकरणांतफसवणुकीची सुरुवात एपीके फाइल किंवा अशालिंकपासून होते. त्यात ‘21’(10 अंकी मोबाईलक्रमांक)# या स्वरूपातील विशेष कोड लपवलेलाअसतो. ही फाइल इन्स्टॉल करताच किंवा लिंकवरक्लिक करताच तुमचे व्हॉट्सअॅप खाते हॅक होऊ शकतेकिंवा त्यावरील नियंत्रण सायबर ठकांकडे जाऊ शकते.त्यानंतर वापरकर्त्याच्या माहितीशिवाय कॉल फॉरवर्डिंगआणि एसएमएस फॉरवर्डिंग सुरू केले जाते. सायबर ठकपीडिताचे व्हॉट्सअॅप वापरतो. त्यावरील संदेश वाचतोआणि त्याच खात्याचा वापर पुढील फसवणुकीसाठीकरतो. अनेकदा तो पीडिताच्या कुटुंबीयांशी किंवा मित्रांशीसंपर्क साधून त्यांनाही फसवणुकीचे बळी बनवण्याचाप्रयत्न करतो. अशी कोणतीही सायबर फसवणूकझाल्यास सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरून ##21#डायलकरावे. हा साधा कोड सर्व कॉल फॉरवर्डिंग आणिएसएमएस फॉरवर्डिंग सेवा एकाच वेळी बंद करतो.त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या अधिकृत तक्रार प्रणालीमध्ये‘My Account Has Been Hacked” हा पर्याय निवडूनतक्रार नोंदवावी. फेसबुक खाते प्रभावित झाल्यास त्याचीअधिकृत रिकव्हरी सुविधा वापरावी. तसेच इन्स्टाग्रामखाते प्रभावित झाल्यास त्याच्या अधिकृत तक्रारप्रणालीचा वापर करावा. फक्त तांत्रिक माहिती नसलेले लोकच सायबर गुन्ह्यांचेबळी ठरतात, असे समजणे चुकीचे आहे. उच्चशिक्षितव्यक्ती, संगणक अभियंता किंवा नियमितपणे सायबरसुरक्षेच्या सूचना पाळणारी व्यक्तीदेखील याची शिकारहोऊ शकते. मानसिक थकवा, ताण, शारीरिक अस्वास्थ्यकिंवा क्षणिक निष्काळजीपणामुळे व्यक्तीची सतर्कताकमी होते. अशाच एखाद्या कमकुवत क्षणी विश्वासार्हवाटणारा फोन किंवा संदेश आपले काम करून जातो.
सायबर गुन्हेगार आपल्या शांततेवर अवलंबून असतात.फसवणुकीतून बचावलेल्या लोकांनीही तक्रार केली नाहीतर तेच मोबाईल क्रमांक सक्रिय राहतात आणि नव्यालोकांना बळी बनवत राहतात. यापासून बचाव करा.सतर्क राहा. तातडीने तक्रार नोंदवा. कोणत्याहीसमस्येवरील उपाय शोधण्याची सुरुवात इथूनच होते. (हे लेखकांचे वैयक्तिक मत आहे.)
Source link










