Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्ररणसिंग महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन उत्साहात;आण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातून समाजपरिवर्तनाचा संदेश

रणसिंग महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन उत्साहात;आण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातून समाजपरिवर्तनाचा संदेश

रणसिंग महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन उत्साहात;आण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातून समाजपरिवर्तनाचा संदेश

इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे :-   कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्या हस्ते साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,क्रिडा संचालक सुहास भैरट,डॉ. विलास बुवा,डॉ.रामचंद्र पाखरे,डॉ. ज्योत्सना गायकवाड,प्रा.राजेंद्रकुमार डांगे,प्रा.विनायक शिंदे इ मान्यवर उपस्थित होते.
प्रा.राजकुमार शेलार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्यसंपदा आणि सामाजिक योगदान सांगितले.अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा आढावा घेतला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांचे वास्तव प्रभावीपणे मांडले, साठे यांचा रशिया दौरा हा मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानास्पद ठरला असून त्यांच्या साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
‘दीड दिवसाची शाळा’ या अनुभवातून अण्णाभाऊंनी आत्मसात केलेले ज्ञान, त्यांची जिद्द, लोककला आणि साहित्यावरील निष्ठा यामुळे ते जनतेचे साहित्यिक बनल्याचे प्रा. शेलार यांनी स्पष्ट केले.विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता वाचन, लेखन आणि सामाजिक जाण विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अभिजीत शिंगाडे यांनी केले.
कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments