Tuesday, August 11, 2026
Homeफलटणदिल्लीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सदिच्छा भेट;...

दिल्लीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सदिच्छा भेट; सातारा–सोलापूरच्या विकास प्रश्नांवर सविस्तर चर्चा

प्रलंबित विकासकामे, राजकीय घडामोडी आणि मतदारसंघातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा; विकासाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा

फलटण  / प्रतिनिधी : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज नवी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामे, मतदारसंघाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत पायाभूत सुविधा, रस्ते विकास, केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विषयांवर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला. त्यामुळे येत्या काळात या भागातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यापूर्वीही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून विविध विकासकामांना मंजुरी मिळवून दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली होती.

आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीमुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राष्ट्रीय पातळीवरील राजकीय संपर्क आणि प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीतून सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या विकासासाठी नवे निर्णय आणि प्रकल्प मार्गी लागण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments