Tuesday, August 11, 2026
Homeफलटणशिक्षणातून रोजगाराकडे… मुधोजी महाविद्यालयाने दाखविली नवी दिशा

शिक्षणातून रोजगाराकडे… मुधोजी महाविद्यालयाने दाखविली नवी दिशा

कौशल्याधारित शिक्षणाला नवी दिशा; मुधोजी महाविद्यालयात आंतरवासिता (ओ.जी. टी) कार्यशाळेची प्रभावी मुहूर्तमेढ

फलटण, दि. ३ ऑगस्ट : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व OJT Cell यांच्या संयुक्त विद्यमाने “Implementation of OJT (On Job Training)” या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने आयोजित या कार्यशाळेला प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम होते.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. (डॉ.) विकास काकडे, प्राचार्य, एस. बी. आर. कॉलेज, म्हसवड (जि. सातारा) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी On Job Training (OJT) ही केवळ अभ्यासक्रमातील औपचारिक बाब नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, उद्योगसंवाद आणि रोजगारक्षमतेला बळकटी देणारी प्रभावी शैक्षणिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. आंतरवासिता ( ओ.जी. टी) चे नियोजन, उद्योगांशी समन्वय, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, आवश्यक दस्तऐवजीकरण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने त्याची प्रभावी अंमलबजावणी याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. त्यांच्या अनुभवसमृद्ध मार्गदर्शनामुळे उपस्थित प्राध्यापकांना आंतरवासिता ( ओ.जी. टी) राबविण्याबाबत व्यावहारिक दिशा मिळाली.
कार्यक्रमास प्रा. (डॉ.) पी. आर. पवार, NEP Nodal Officer तथा मराठी विभागप्रमुख आणि प्रा. (डॉ.) टी. पी. शिंदे, IQAC समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. (डॉ.) पी. एच. कदम यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आंतरवासिता ( ओ.जी. टी) ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रत्येक विभागाने आंतरवासिता ( ओ.जी. टी) प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
कार्यशाळेनंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात प्राध्यापकांनी आंतरवासिता ( ओ.जी. टी)अंमलबजावणीसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाचे नियोजन डॉ. ए. के. शिंदे, समन्वयक, OJT Cell यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ललित वेलेकर यांनी केले, तर प्रा. गायकवाड पी. एम. यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यशाळेस महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी जोडणारे, कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणारे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे हे आयोजन मुधोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments