रजनीश गुप्ता अन् विपुल अनेकांत यांचा काॅलम: सायबर ठकांची मोठी शक्ती म्हणजे आपली शांतता, निष्क्रियता‎

0
1
रजनीश गुप्ता अन् विपुल अनेकांत यांचा काॅलम:  सायबर ठकांची मोठी शक्ती म्हणजे आपली शांतता, निष्क्रियता‎




‎‎‎‎‎‎‎‎‎‎दररोज हजारो नागरिकांना सायबर ठकांचे संशयास्पद‎फोन, संदेश किंवा व्हॉट्सअॅपवरील लिंक येतात. यापैकी‎बहुतांश लोक फसवणुकीचे बळी ठरत नाहीत. ते फोन‎कट करतात किंवा संदेशाकडे दुर्लक्ष करतात. तरीही‎अशा फसवणुकीच्या प्रयत्नांची तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण‎अंदाजे 5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यामागे अनेक कारणे‎आहेत. लोकांकडे वेळ नसतो. अनेकांचा यंत्रणांवर‎विश्वास नसतो. काही जण नोकरशाहीची उदासीनता‎किंवा अधिकाऱ्यांच्या नकारात्मक अनुभवांमुळे तक्रार‎करण्याचे टाळतात. मात्र याचा परिणाम असा होतो की,‎सायबर ठगांचा मोबाईल क्रमांक सक्रिय राहतो आणि तो‎नव्या लोकांना लक्ष्य करत राहतो.‎ नागरिकांची ही शांतता गुन्हेगारांसाठी फायदेशीर ठरते.‎अधिकाधिक लोकांनी फसवणुकीचा प्रयत्न अयशस्वी‎झाला तरी त्याची तक्रार नोंदवली, तर सायबर ठगांचे‎संपूर्ण जाळे अतिशय लवकर कमकुवत करता येऊ‎शकते. पण प्रश्न असा आहे की, तक्रार कुठे आणि कशी‎करायची?‎ चांगली बाब म्हणजे आता तक्रार करण्यासाठी पोलिस‎ठाणे किंवा सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.‎दूरसंचार विभागाने (डीओटी) विकसित केलेल्या ‘संचार‎साथी” या मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोणताही‎नागरिक घरबसल्या संशयास्पद मोबाईल क्रमांकाची‎तक्रार नोंदवू शकतो. काही मिनिटांतच ही प्रक्रिया सायबर‎ठकाचे सिम कार्ड आणि गरज पडल्यास त्याचा मोबाईल‎हँडसेटही ब्लॉक करण्यास मदत करू शकते.‎ सायबर फसवणुकीची तांत्रिक प्रक्रिया समजून घेतल्यास‎लोक वेळेत सावध होऊ शकतात. अनेक प्रकरणांत‎फसवणुकीची सुरुवात एपीके फाइल किंवा अशा‎लिंकपासून होते. त्यात ‘21’(10 अंकी मोबाईल‎क्रमांक)# या स्वरूपातील विशेष कोड लपवलेला‎असतो. ही फाइल इन्स्टॉल करताच किंवा लिंकवर‎क्लिक करताच तुमचे व्हॉट्सअॅप खाते हॅक होऊ शकते‎किंवा त्यावरील नियंत्रण सायबर ठकांकडे जाऊ शकते.‎त्यानंतर वापरकर्त्याच्या माहितीशिवाय कॉल फॉरवर्डिंग‎आणि एसएमएस फॉरवर्डिंग सुरू केले जाते. सायबर ठक‎पीडिताचे व्हॉट्सअॅप वापरतो. त्यावरील संदेश वाचतो‎आणि त्याच खात्याचा वापर पुढील फसवणुकीसाठी‎करतो. अनेकदा तो पीडिताच्या कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी‎संपर्क साधून त्यांनाही फसवणुकीचे बळी बनवण्याचा‎प्रयत्न करतो. अशी कोणतीही सायबर फसवणूक‎झाल्यास सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरून ##21#डायल‎करावे. हा साधा कोड सर्व कॉल फॉरवर्डिंग आणि‎एसएमएस फॉरवर्डिंग सेवा एकाच वेळी बंद करतो.‎त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या अधिकृत तक्रार प्रणालीमध्ये‎‘My Account Has Been Hacked” हा पर्याय निवडून‎तक्रार नोंदवावी. फेसबुक खाते प्रभावित झाल्यास त्याची‎अधिकृत रिकव्हरी सुविधा वापरावी. तसेच इन्स्टाग्राम‎खाते प्रभावित झाल्यास त्याच्या अधिकृत तक्रार‎प्रणालीचा वापर करावा.‎ फक्त तांत्रिक माहिती नसलेले लोकच सायबर गुन्ह्यांचे‎बळी ठरतात, असे समजणे चुकीचे आहे. उच्चशिक्षित‎व्यक्ती, संगणक अभियंता किंवा नियमितपणे सायबर‎सुरक्षेच्या सूचना पाळणारी व्यक्तीदेखील याची शिकार‎होऊ शकते. मानसिक थकवा, ताण, शारीरिक अस्वास्थ्य‎किंवा क्षणिक निष्काळजीपणामुळे व्यक्तीची सतर्कता‎कमी होते. अशाच एखाद्या कमकुवत क्षणी विश्वासार्ह‎वाटणारा फोन किंवा संदेश आपले काम करून जातो.‎

सायबर गुन्हेगार आपल्या शांततेवर अवलंबून असतात.‎फसवणुकीतून बचावलेल्या लोकांनीही तक्रार केली नाही‎तर तेच मोबाईल क्रमांक सक्रिय राहतात आणि नव्या‎लोकांना बळी बनवत राहतात. यापासून बचाव करा.‎सतर्क राहा. तातडीने तक्रार नोंदवा. कोणत्याही‎समस्येवरील उपाय शोधण्याची सुरुवात इथूनच होते. (हे लेखकांचे वैयक्तिक मत आहे.)‎



Source link