जेव्हा जर्मन फुटबॉल खेळाडू डेनिस उन्दवने खेळाच्याशेवटच्या क्षणी दोन गोल करून आपल्या संघालाआयव्हरी कोस्टविरुद्ध 2-1 ने विजय मिळवून दिला, तेव्हातुम्हाला असे फार कमी जर्मन चाहते मिळतील, जे त्यालाराष्ट्रीय नायक मानत नाहीत. कुर्द-यहुदी आई-वडिलांच्याया तुर्की-सीरियन मुलाचे रूप पारंपरिक जर्मनसारखे नाही,याकडे फार कमी लोकांनी लक्ष दिले. परंतु, त्याने जर्मनटीमला एक थरारक विजय मिळवून दिला, ज्यावरून हेसिद्ध होते की, हा “सुंदर खेळ” इतर कोणत्याही खेळाच्यातुलनेत जागतिक स्तरावर इतके प्रेक्षक का मिळवतो.उन्दवचे यश हे कट्टरवाद्यांच्या तोंडावर मारलेलीचपराकही होती. तो आणि त्याचा संघ या गोष्टीचा जिवंतपुरावा आहेत की, अत्यंत भिन्न पार्श्वभूमी आणि रूप-रंगअसलेले लोक एका सामायिक उद्दिष्टासाठी एकत्र येऊशकतात आणि ते सामूहिक अभिमानाचे स्रोतही ठरूशकतात. ते दाखवून देतात की आपल्या देशावर प्रेम करणे(जे अनेकदा डाव्या विचारसरणीत विकृत स्वरूपातमांडले जाते किंवा फॅशनेबल मानले जात नाही) आणिनवीन लोकांचे स्वागत करणे (जे कट्टर दक्षिणपंथी लोकनापसंत करतात) हे एकमेकांच्या विरोधी विचार नाहीत. आणि हे केवळ जर्मन टीमपुरते मर्यादित नाही. या वेळीतीन देशांतर्गत संयुक्तपणे आयोजित केला जाणारा फिफाविश्वचषक, अब्जावधी प्रेक्षकांसमोर सातत्यानेवांशिकदृष्ट्या मिश्रित संघ सादर करत आहे.विश्वचषकातील प्रत्येक गंभीर दावेदार देश अशाखेळाडूंना मैदानात उतरवत आहे, ज्यांचे कुटुंब केवळएक किंवा दोन पिढ्यांपूर्वी तिथे आले होते, आणि असेअसूनही ते सर्वजण एक प्रसन्न देशभक्तीची लाट प्रेरितकरत आहेत. विविधता आणि राष्ट्रीय अभिमानाचे हे संयोजन अशी गोष्ट आहे, जिला राजकीय टोकाचीकट्टरता अशक्य मानते. औद्योगिकीकृत जगाच्या बहुतेक भागांत, मुख्य प्रवाहातील राजकारण हे सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या भिन्न लोकांचे आगमन आणि अशा स्थलांतरामुळे होणाऱ्या कथित असंतोषाबाबत चिंतेत बुडालेले असते. एका काळात इंटरनेटच्या अंधाऱ्या कोपऱ्यांपुरते मर्यादित असलेले विचार – जसे की “ग्रेट रिप्लेसमेंट सिद्धांत” आणि “री-इमिग्रेशन’ ची मागणी -आता सन्माननीय व्यासपीठांवर केले जात आहेत आणि त्यावर चर्चाही होत आहेत. एका ताज्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, 45% ब्रिटिश, 50% डॅनिश, 51%फ्रेंच, 53% जर्मन, 51% इटालियन, 52% पोलंड आणि46% स्पॅनिश लोक अशा परिस्थितीचे समर्थन करतील, ज्यात स्थलांतर रोखले जाईल आणि अलीकडे आलेले अनेक स्थलांतरित पुन्हा परत जातील. निश्चितपणे, वांशिक शुद्धीकरणासारख्या कठोरप्रक्रियेद्वारे स्थलांतरितांना बळजबरीने हाकलून देण्याच्यागोष्टींना मोठा पाठिंबा मिळेल, याचा कोणताही पुरावानाही. परंतु, असे इशारे देऊनही एक दशकापूर्वीच्यातुलनेत धक्कादायक बदल पाहायला मिळतो. एकादशकापूर्वी याच देशांतील अनेकांनी मध्य-पूर्वेतीलयुद्धापासून पळून येणाऱ्या स्थलांतरितांचे स्वागत केले होते. यादरम्यान, डाव्या विचारसरणीचा मोठा भागही प्रत्येकमुद्द्याला शोषक आणि शोषित यांच्या नजरेतूनपाहण्याच्या सवयीमुळे एका वेगळ्या, पण त्रासदायकदिशेने पुढे गेला आहे. या सरलीकृत दृष्टिकोनामुळेपाश्चात्त्य देश नेहमी खलनायक ठरतात आणि देशप्रेमालानेहमी संशयाने किंवा तिरस्काराने पाहिले पाहिजे, असेमानले जाते. हा बदल मतदानाच्या आकडेवारीतही दिसूनयेतो. गॅलपच्या मते, अमेरिकन असल्याचा अभिमानवाटणाऱ्या डेमोक्रॅट्सचे प्रमाण 2000 च्या दशकाच्यासुरुवातीला 60% पेक्षा जास्त होते, ते 2019 मध्ये केवळ22% वर आले आहे. या घसरणीचा मोठा हिस्सा डोनाल्डट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळाशी संबंधित आहे,ज्यावरून हे दिसून येते की हे सत्तेत बसलेल्या लोकांवरीलअसंतोष दर्शवते. तरीही, कल स्पष्ट आहेत. हे गुपित नाहीकी, अनेक डाव्या विचारसरणीच्या लोकांसाठी राष्ट्रीयअभिमानाची गोष्ट आता लाजिरवाणी बनली आहे. ही एक चिंताजनक प्रवृत्ती आहे, कारण सामायिकओळखीच्या आधाराशिवाय, वंचित लोकांचे समर्थनकरण्यासाठी बनवलेल्या धोरणांभोवती राजकारणएकवटण्याची शक्यता कमी होते. यामध्ये महाविद्यालयीनपदवी नसलेल्या कामगारांचाही समावेश आहे, जेऔद्योगिकीकृत जगात अनेक दशकांपासून संघर्ष करतआहेत. अर्थात, व्यावसायिक ॲथलेटिक्स हे समाजाचा एकआदर्श आरसा नाही. कोणताही राष्ट्रीय संघ हा एकछोटा, संसाधनेसंपन्न आणि अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केलेला गट असतो, जो सामना जिंकण्याच्यास्पष्ट लक्ष्याने एकत्र असतो. एक विजयी संघ बनवणे, हेमोठ्या लोकसंख्येला घरे, शाळा आणि श्रम बाजारातएकत्र करण्यासारखे नाही. खेळांमध्येही एकत्रीकरणइतके सहज राहिलेले नाही. युरो 2020 चा अंतिम सामना हरल्यानंतर इंग्लंडच्याकृष्णवर्णीय खेळाडूंना वर्णद्वेषी शिवीगाळ करण्यात आलीहोती. फ्रान्सच्या राष्ट्रीय संघाला नेहमीच या वादातओढले जाते की, त्यात कोण खरोखर फ्रेंच आहे काआणि अमेरिकेत तर अनेक खेळांमध्ये वर्णद्वेषाचा एककाळा इतिहास राहिला आहे. एकत्रीकरणाचा आनंदअनेक लोक साजरा करू शकतात, परंतु अल्गोरिदमद्वारेसशक्त झालेले आवाज आज खूप सशक्त आणिप्रमाणानुसार प्रभावशाली झाले आहेत. या अर्थाने, खेळहीसमाजात दिसणाऱ्या पॅटर्नचीच नक्कल करतात. विश्वचषक हे सिद्ध करत नाही की, वेगवेगळ्यापार्श्वभूमीच्या लोकांना एका सूत्रात बांधणे सोपे आहे.परंतु, तो त्या गोष्टीची पुष्टी नक्कीच करतो, जिलाकट्टरपंथी नाकारू इच्छित आहेत आणि ती म्हणजेवांशिक एकता आणि देशाचा अभिमान नियमितपणेएकत्र राहू शकतात. आपल्या बहुवांशिक टीमला राष्ट्रीयध्वज उंचावताना पाहणारे बहुतांश चाहते कोणत्याहीलाघवाशिवाय या सत्याचा अनुभव घेतात. जर कट्टर दक्षिणपंथी आणि डावे यांनी आपला अहंकारथोड्या काळासाठी बाजूला ठेवून विश्वचषकाचे काहीसामने पाहिले, तर ते त्या गोष्टीचा पुन्हा शोध घेऊशकतात, जी आपल्याला आधीच माहीत आहे. ती ही की,जेव्हा एकता आणि राष्ट्रीय अभिमान एकत्र चालतात,तेव्हा बहुतेक प्रकरणांत निकाल विजय मिळवून देणाराचअसतो! (@प्रोजेक्ट सिंडिकेट) आपल्या देशावर प्रेम आणि भिन्नओळख असलेल्यांचे स्वागतहे खरे आहे की, कोणताही विश्वचषक हे सिद्ध करूशकत नाही की, वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांना एकासूत्रात बांधणे सोपे आहे. परंतु, हे निश्चितपणे सिद्ध करतोकी वांशिक एकता आणि देशाचा अभिमान एकत्र राहूशकतात.
Source link










