डेरोन एस्मोगलू यांचा कॉलम: सामंजस्यातून मानव काय साध्य करू शकत नाही?‎

0
3
डेरोन एस्मोगलू यांचा कॉलम:  सामंजस्यातून मानव काय साध्य करू शकत नाही?‎




‎‎‎‎‎‎‎‎‎‎जेव्हा जर्मन फुटबॉल खेळाडू डेनिस उन्दवने खेळाच्या‎शेवटच्या क्षणी दोन गोल करून आपल्या संघाला‎आयव्हरी कोस्टविरुद्ध 2-1 ने विजय मिळवून दिला, तेव्हा‎तुम्हाला असे फार कमी जर्मन चाहते मिळतील, जे त्याला‎राष्ट्रीय नायक मानत नाहीत. कुर्द-यहुदी आई-वडिलांच्या‎या तुर्की-सीरियन मुलाचे रूप पारंपरिक जर्मनसारखे नाही,‎याकडे फार कमी लोकांनी लक्ष दिले. परंतु, त्याने जर्मन‎टीमला एक थरारक विजय मिळवून दिला, ज्यावरून हे‎सिद्ध होते की, हा “सुंदर खेळ” इतर कोणत्याही खेळाच्या‎तुलनेत जागतिक स्तरावर इतके प्रेक्षक का मिळवतो.‎उन्दवचे यश हे कट्टरवाद्यांच्या तोंडावर मारलेली‎चपराकही होती. तो आणि त्याचा संघ या गोष्टीचा जिवंत‎पुरावा आहेत की, अत्यंत भिन्न पार्श्वभूमी आणि रूप-रंग‎असलेले लोक एका सामायिक उद्दिष्टासाठी एकत्र येऊ‎शकतात आणि ते सामूहिक अभिमानाचे स्रोतही ठरू‎शकतात. ते दाखवून देतात की आपल्या देशावर प्रेम करणे‎(जे अनेकदा डाव्या विचारसरणीत विकृत स्वरूपात‎मांडले जाते किंवा फॅशनेबल मानले जात नाही) आणि‎नवीन लोकांचे स्वागत करणे (जे कट्टर दक्षिणपंथी लोक‎नापसंत करतात) हे एकमेकांच्या विरोधी विचार नाहीत.‎ आणि हे केवळ जर्मन टीमपुरते मर्यादित नाही. या वेळी‎तीन देशांतर्गत संयुक्तपणे आयोजित केला जाणारा फिफा‎विश्वचषक, अब्जावधी प्रेक्षकांसमोर सातत्याने‎वांशिकदृष्ट्या मिश्रित संघ सादर करत आहे.‎विश्वचषकातील प्रत्येक गंभीर दावेदार देश अशा‎खेळाडूंना मैदानात उतरवत आहे, ज्यांचे कुटुंब केवळ‎एक किंवा दोन पिढ्यांपूर्वी तिथे आले होते, आणि असे‎असूनही ते सर्वजण एक प्रसन्न देशभक्तीची लाट प्रेरित‎करत आहेत. विविधता आणि राष्ट्रीय अभिमानाचे हे ‎‎संयोजन अशी गोष्ट आहे, जिला राजकीय टोकाची‎कट्टरता अशक्य मानते. औद्योगिकीकृत जगाच्या बहुतेक ‎‎भागांत, मुख्य प्रवाहातील राजकारण हे सांस्कृतिक आणि ‎‎वांशिकदृष्ट्या भिन्न लोकांचे आगमन आणि अशा ‎‎स्थलांतरामुळे होणाऱ्या कथित असंतोषाबाबत चिंतेत ‎‎बुडालेले असते. एका काळात इंटरनेटच्या अंधाऱ्या ‎‎कोपऱ्यांपुरते मर्यादित असलेले विचार – जसे की “ग्रेट ‎‎रिप्लेसमेंट सिद्धांत” आणि “री-इमिग्रेशन’ ची मागणी -‎आता सन्माननीय व्यासपीठांवर केले जात आहेत आणि ‎‎त्यावर चर्चाही होत आहेत. एका ताज्या सर्वेक्षणात असे ‎‎आढळून आले की, 45% ब्रिटिश, 50% डॅनिश, 51%‎फ्रेंच, 53% जर्मन, 51% इटालियन, 52% पोलंड आणि‎46% स्पॅनिश लोक अशा परिस्थितीचे समर्थन करतील, ‎‎ज्यात स्थलांतर रोखले जाईल आणि अलीकडे आलेले ‎‎अनेक स्थलांतरित पुन्हा परत जातील.‎ निश्चितपणे, वांशिक शुद्धीकरणासारख्या कठोर‎प्रक्रियेद्वारे स्थलांतरितांना बळजबरीने हाकलून देण्याच्या‎गोष्टींना मोठा पाठिंबा मिळेल, याचा कोणताही पुरावा‎नाही. परंतु, असे इशारे देऊनही एक दशकापूर्वीच्या‎तुलनेत धक्कादायक बदल पाहायला मिळतो. एका‎दशकापूर्वी याच देशांतील अनेकांनी मध्य-पूर्वेतील‎युद्धापासून पळून येणाऱ्या स्थलांतरितांचे स्वागत केले होते.‎ यादरम्यान, डाव्या विचारसरणीचा मोठा भागही प्रत्येक‎मुद्द्याला शोषक आणि शोषित यांच्या नजरेतून‎पाहण्याच्या सवयीमुळे एका वेगळ्या, पण त्रासदायक‎दिशेने पुढे गेला आहे. या सरलीकृत दृष्टिकोनामुळे‎पाश्चात्त्य देश नेहमी खलनायक ठरतात आणि देशप्रेमाला‎नेहमी संशयाने किंवा तिरस्काराने पाहिले पाहिजे, असे‎मानले जाते. हा बदल मतदानाच्या आकडेवारीतही दिसून‎येतो. गॅलपच्या मते, अमेरिकन असल्याचा अभिमान‎वाटणाऱ्या डेमोक्रॅट्सचे प्रमाण 2000 च्या दशकाच्या‎सुरुवातीला 60% पेक्षा जास्त होते, ते 2019 मध्ये केवळ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎22% वर आले आहे. या घसरणीचा मोठा हिस्सा डोनाल्ड‎ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळाशी संबंधित आहे,‎ज्यावरून हे दिसून येते की हे सत्तेत बसलेल्या लोकांवरील‎असंतोष दर्शवते. तरीही, कल स्पष्ट आहेत. हे गुपित नाही‎की, अनेक डाव्या विचारसरणीच्या लोकांसाठी राष्ट्रीय‎अभिमानाची गोष्ट आता लाजिरवाणी बनली आहे.‎ ही एक चिंताजनक प्रवृत्ती आहे, कारण सामायिक‎ओळखीच्या आधाराशिवाय, वंचित लोकांचे समर्थन‎करण्यासाठी बनवलेल्या धोरणांभोवती राजकारण‎एकवटण्याची शक्यता कमी होते. यामध्ये महाविद्यालयीन‎पदवी नसलेल्या कामगारांचाही समावेश आहे, जे‎औद्योगिकीकृत जगात अनेक दशकांपासून संघर्ष करत‎आहेत.‎ अर्थात, व्यावसायिक ॲथलेटिक्स हे समाजाचा एक‎आदर्श आरसा नाही. कोणताही राष्ट्रीय संघ हा एक‎छोटा, संसाधनेसंपन्न आणि अत्यंत चांगल्या प्रकारे ‎‎व्यवस्थापित केलेला गट असतो, जो सामना जिंकण्याच्या‎स्पष्ट लक्ष्याने एकत्र असतो. एक विजयी संघ बनवणे, हे‎मोठ्या लोकसंख्येला घरे, शाळा आणि श्रम बाजारात‎एकत्र करण्यासारखे नाही. खेळांमध्येही एकत्रीकरण‎इतके सहज राहिलेले नाही.‎ युरो 2020 चा अंतिम सामना हरल्यानंतर इंग्लंडच्या‎कृष्णवर्णीय खेळाडूंना वर्णद्वेषी शिवीगाळ करण्यात आली‎होती. फ्रान्सच्या राष्ट्रीय संघाला नेहमीच या वादात‎ओढले जाते की, त्यात कोण खरोखर फ्रेंच आहे का‎आणि अमेरिकेत तर अनेक खेळांमध्ये वर्णद्वेषाचा एक‎काळा इतिहास राहिला आहे. एकत्रीकरणाचा आनंद‎अनेक लोक साजरा करू शकतात, परंतु अल्गोरिदमद्वारे‎सशक्त झालेले आवाज आज खूप सशक्त आणि‎प्रमाणानुसार प्रभावशाली झाले आहेत. या अर्थाने, खेळही‎समाजात दिसणाऱ्या पॅटर्नचीच नक्कल करतात.‎ विश्वचषक हे सिद्ध करत नाही की, वेगवेगळ्या‎पार्श्वभूमीच्या लोकांना एका सूत्रात बांधणे सोपे आहे.‎परंतु, तो त्या गोष्टीची पुष्टी नक्कीच करतो, जिला‎कट्टरपंथी नाकारू इच्छित आहेत आणि ती म्हणजे‎वांशिक एकता आणि देशाचा अभिमान नियमितपणे‎एकत्र राहू शकतात. आपल्या बहुवांशिक टीमला राष्ट्रीय‎ध्वज उंचावताना पाहणारे बहुतांश चाहते कोणत्याही‎लाघवाशिवाय या सत्याचा अनुभव घेतात.‎ जर कट्टर दक्षिणपंथी आणि डावे यांनी आपला अहंकार‎थोड्या काळासाठी बाजूला ठेवून विश्वचषकाचे काही‎सामने पाहिले, तर ते त्या गोष्टीचा पुन्हा शोध घेऊ‎शकतात, जी आपल्याला आधीच माहीत आहे. ती ही की,‎जेव्हा एकता आणि राष्ट्रीय अभिमान एकत्र चालतात,‎तेव्हा बहुतेक प्रकरणांत निकाल विजय मिळवून देणाराच‎असतो! (@प्रोजेक्ट सिंडिकेट)‎ आपल्या देशावर प्रेम आणि भिन्न‎ओळख असलेल्यांचे स्वागत‎हे खरे आहे की, कोणताही विश्वचषक हे सिद्ध करू‎शकत नाही की, वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांना एका‎सूत्रात बांधणे सोपे आहे. परंतु, हे निश्चितपणे सिद्ध करतो‎की वांशिक एकता आणि देशाचा अभिमान एकत्र राहू‎शकतात.‎



Source link