Tuesday, August 11, 2026
Homeफलटणफलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बबनराव मुळीक यांना ‘कृषी उद्यान पंडित’ पुरस्कार

फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बबनराव मुळीक यांना ‘कृषी उद्यान पंडित’ पुरस्कार

फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बबनराव मुळीक यांना ‘कृषी उद्यान पंडित’ पुरस्कार

फलटण : फलटण तालुक्यातील सासकल येथील प्रगतशील शेतकरी श्री. बबनराव मुळीक यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ चा फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘कृषी उद्यान पंडित’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री. मुळीक यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत फलोत्पादन क्षेत्रात विविध प्रयोग यशस्वीरीत्या राबविले आहेत. फळबाग व्यवस्थापन, ठिबक सिंचन, पाणी बचत, सेंद्रिय व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून त्यांनी उत्पादनवाढीसोबतच दर्जेदार फळनिर्मिती साध्य केली आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली असून आधुनिक शेतीचे मार्गदर्शनही त्यांनी वेळोवेळी केले आहे.

या पुरस्कारप्राप्तीबद्दल मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्या. भाडळी बु. चे चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. मोहनराव डांगे, ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच मोहनराव मुळीक, माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश मदने,माजी उपसरपंच संजय बबन चांगण, विकास लक्ष्मण मुळीक आदी मान्यवरांनी श्री. बबनराव मुळीक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या यशाबद्दल श्री. बबनराव मुळीक यांचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments