Friday, September 11, 2026
Homeमहाराष्ट्रसामाजिक बांधिलकी जपणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व; मोहन तिकोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सामाजिक बांधिलकी जपणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व; मोहन तिकोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सामाजिक बांधिलकी जपणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व; मोहन तिकोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


अकलूज | प्रतिनिधी. अन्नपूर्णा मंगल कार्यालयाचे मालक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे मोहन तिकोटे यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी आणि शुभेच्छांच्या वर्षावात साजरा होत आहे.
अकलूज शहर आणि परिसरात मोहन तिकोटे हे केवळ उद्योजक म्हणून नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीला तत्पर असणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. गरजू नागरिकांना मदतीचा हात देणे, सामाजिक उपक्रमांना पाठबळ देणे, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसाठी विविध योजना राबविण्यासाठी पुढाकार घेणे, ही त्यांची कार्यशैली राहिली आहे.
अलीकडेच अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक १० मध्ये महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित एनसीएमसी स्मार्ट कार्ड आणि एसटी पास विशेष शिबिराला त्यांनी सक्रिय सहकार्य केले. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना शासकीय सुविधांचा लाभ मिळाला. तसेच शहरात झालेल्या  वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मोहन तिकोटे आणि त्यांच्या पत्नी अकलूज नगर परिषदेच्या नगरसेविका मनिषाताई तिकोटे , तसेच त्यांच्या कुटुंबाने तात्काळ पुढाकार घेतला. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन प्रशासनाशी समन्वय साधत मदतकार्य उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मोहन तिकोटे यांची सामाजिक जाणीव, लोकांप्रती असलेली आत्मीयता आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम उपलब्ध राहणारे आणि समाजहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

साहस Times तर्फे मोहन तिकोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments