Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रसांची महोत्सवानिमित्त पांथस्थचा विशेष अभ्यास दौरा; स्थवीर सारीपुत्त व स्थवीर महामोग्गलायन यांच्या...

सांची महोत्सवानिमित्त पांथस्थचा विशेष अभ्यास दौरा; स्थवीर सारीपुत्त व स्थवीर महामोग्गलायन यांच्या पवित्र धातूंच्या दर्शनाची सुवर्णसंधी

सांची महोत्सवानिमित्त पांथस्थचा विशेष अभ्यास दौरा; स्थवीर सारीपुत्त व स्थवीर महामोग्गलायन यांच्या पवित्र धातूंच्या दर्शनाची सुवर्णसंधी

फलटण प्रतिनिधी : बौद्ध धम्माचा गौरवशाली इतिहास, प्राचीन बौद्ध वारसा आणि ऐतिहासिक स्थळांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने पांथस्थच्या माध्यमातून विविध अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा ठरत आहे तो सांची महोत्सव अभ्यास दौरा.

सांची महोत्सवादरम्यान भगवान गौतम बुद्धांचे दोन महान अग्रश्रावक स्थवीर सारीपुत्त व स्थवीर महामोग्गलायन यांच्या पवित्र शारीरिक धातू जनमानसाच्या दर्शनासाठी बाहेर काढले जातात. या पवित्र धातूंचे दर्शन घेण्याची आणि सांचीच्या ऐतिहासिक बौद्ध वारशाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी धम्मप्रेमी व अभ्यासकांना मिळणार आहे.

या विशेष पर्वाचे औचित्य साधून पांथस्थच्या वतीने २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत सांची महोत्सव अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी आपली नावे लवकरात लवकर नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, पांथस्थच्या माध्यमातून आगामी काळात छत्तीसगडमधील शिरपूर, तेलंगणातील बुद्धवनम, पितळखोरा लेणी आणि सांची महोत्सव अशा महत्त्वपूर्ण बौद्ध व ऐतिहासिक स्थळांसाठी अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

पांथस्थचे आगामी नियोजित अभ्यास दौरे व नोंदणी लिंक

१) छत्तीसगड (शिरपूर) अभ्यास दौरा – ऑक्टोबर

या अभ्यास दौऱ्यासाठी शेवटच्या मोजक्या जागा शिल्लक असून इच्छुकांनी तातडीने नोंदणी करावी.

नोंदणीसाठी पूर्ण लिंक :
https://chat.whatsapp.com/CXJrf4b1NZILayw4RR89bR

२) तेलंगणा (बुद्धवनम) अभ्यास दौरा – डिसेंबर

बुद्धवनम येथील बौद्ध वारसा व ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास करण्यासाठी हा विशेष दौरा आयोजित करण्यात आला असून नोंदणी सुरू आहे.

नोंदणीसाठी पूर्ण लिंक :
https://chat.whatsapp.com/CP7dLVkDUGwKa03bVWep8W?s=cl&p=a&ilr=1&amv=1

३) निशुल्क एकदिवसीय पितळखोरा लेणी अभ्यास दौरा – ११ ऑक्टोबर २०२६

प्राचीन बौद्ध लेणी आणि ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी देणारा हा निशुल्क एकदिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

नोंदणीसाठी पूर्ण लिंक :
https://chat.whatsapp.com/KMvbRT6kdfaEvY4kJC6KqS?s=cl&p=a&mlu=4

४) सांची महोत्सव अभ्यास दौरा – २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर

स्थवीर सारीपुत्त व स्थवीर महामोग्गलायन यांच्या पवित्र शारीरिक धातूंच्या दर्शनाची विशेष संधी, तसेच सांचीच्या ऐतिहासिक आणि बौद्ध वारशाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी हा विशेष दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी लवकरात लवकर आपली नावे नोंदवावीत.

नोंदणीसाठी पूर्ण लिंक :
https://chat.whatsapp.com/DsNz8T1ZIVDDd7yPVz7NOp?s=cl&p=a&mlu=4

बौद्ध धम्माचा इतिहास, प्राचीन स्तूप, लेणी, वास्तुकला आणि भारतातील समृद्ध बौद्ध सांस्कृतिक वारसा यांचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या धम्मप्रेमी, अभ्यासक आणि नागरिकांनी संबंधित अभ्यास दौऱ्यांच्या नोंदणी लिंकवर जाऊन आपले नाव नोंदवावे, असे आवाहन पांथस्थच्या वतीने करण्यात आले आहे.

सूरज रतन जगताप (लेणी अभ्यासक )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments