अस्पृश्य प्रजा परिषद फलटणसंस्थानात राहणाऱ्या लोकांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा वेगळी नाही. ——– डॉ.बाबासाहेब आंबेडकर

0
12
अस्पृश्य प्रजा परिषद फलटणसंस्थानात राहणाऱ्या लोकांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा वेगळी नाही. ——– डॉ.बाबासाहेब आंबेडकर

अस्पृश्य प्रजा परिषद फलटण
संस्थानात राहणाऱ्या लोकांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा वेगळी नाही. ——– डॉ.बाबासाहेब आंबेडकर
(आज त्या ऐतिहासिक घटनेला 88 अस्पृश्य प्रजा परिषद फलटण)


साहस Times :- आज त्या ऐतिहासिक घटनेला ८७ वर्षे पूर्ण होत आहेत.याच दिवशी २३ एप्रिल १९३९ रोजी या फलटण नगरीतील आम्हा अस्पृश्य बांधवांमध्ये स्पृलिंग चेतवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यांनी त्यावेळी मांडलेली मते आज ही दिशादर्शक आहेत. त्यांनी एकंदरीत संस्थानामधील अस्पृश्य जनतेच्या दैयनीय स्थितीविषयी चिंता व्यक्त करून काही उपाय योजनाही सुचवल्या होत्या.
फलटण संस्थांनाधिपतींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आगाऊच पत्र पाठवून फराळाचे निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे सायंकाळी ४ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मेसर्स गडकरी, देवरुखकर, गायकवाड, रणपिसे, सावंत,के. बी जाधव,शामराव भोळे वगैरे मंडळींसह बरोबर ४ वाजता फलटण संस्थांनाधिपतींच्या खास मोटारीने राजवाड्यात आले.तिथे राजेसाहेबांचे व त्यांचे सार्वजनिक कार्याबाबत थोडे बोलणे झाल्यानंतर थाटाची चहा पार्टी झाली चहा पार्टीनंतर राजवाड्यात डॉ.बाबासाहेब समवेत राजेसाहेब व पाहुणे मंडळी यांचा फोटो झाला. नंतर सायंकाळी ५ वाजता राजवाड्यापासून जंगी मिरवणूक निघून ती सभेच्या मंडपापर्यंत आली.सभेसाठी भव्य मंडप स्टेज तयार केला होता. संस्थानातील सर्व बडी बडी स्त्री पुरुष मंडळी सभेस मुद्दाम आली होती. सुरुवातील स्वागत पद्ये व पोवाडे झाल्यानंतर सभेचे स्वागताध्यक्ष श्री. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेबांचे व जमलेल्या मंडळींचे स्वागत करून आपल्या समाजाने संघटित राहणे किती हिताचे व महत्त्वाचे आहे याचे वर्णन केले. शेवटी डॉ. बाबासाहेबांनी परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती केली. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. बाबासाहेब स्थानापन्न झाले. सभेसाठी फलटण संस्थानातील व संस्थांना बाहेरील असा सुमारे दहा बारा हजार जमाव जमला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलण्यास उठले ते म्हणाले.’ मी फलटण संस्थानातील अस्पृश्य मानलेल्या लोकांच्या परिषदेसाठी जरी इथे आलो असलो तरी सर्वसाधारण जनतेचे कर्तव्य काय, आज जगात काय चालले आहे इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.सर्वसाधारण जनता ही सध्या लोकशाहीची भाषा बोलत असून संस्थानात व संस्थांनाबाहेर लोकशाहीच्या तत्त्वावर सुधारणा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे अशावेळी संस्थानिकांनी ही आपला दृष्टिकोन बदलून प्रजेला जितके अधिक अधिकार देण्यासारखे असतील तेवढे दिले पाहिजेत. आजची संस्थाने ही मागच्या राज्यांची अवशेष आहेत पूर्वीच्या काळी राजांना जर कोणती शिकवणूक मिळत असेल तर ती म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपाल करणे एवढेच होय.! गोब्राह्मण प्रतिपालक हे त्यावेळच्या राजाचे मुख्य कर्तव्य समजले जात असे. गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे गायींना चारा घालून ब्राह्मण जातीचे रक्षण केले म्हणजे राजांचे राजा म्हणून दुसरे कर्तव्यच शिल्लक राहिले नाही असे समजण्यात येई.गो - ब्राह्मण प्रतिपालाखेरीज राजाने दुसरे काही न केले तरी चालत असे. आज सर्व संस्थांनात राहणाऱ्या लोकांच्या परिस्थितीकडे पाहिल्यास त्यांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा मोठी चांगली नाही याचा दोष जर कोणाकडे जाणार असलाच तर तो हिंदू धर्माच्या वरील शिकवणीकडे जाईल. चाणक्यनीती, मनुस्मृती वगैरे ग्रंथांचे अवलोकन केले तर आपणास असे दिसून येईल की त्यांनी राजाचे कर्तव्य म्हणजे खेड्यापाड्यातून शाळा काढुन लोकांना सुविद्य करणे अगर लोकहिताच्या गोष्टी करणे यांचा कोठेच मागमूस ही आढळणार नाही.या सर्व गोष्टी आपण इंग्रजांपासून शिकलो आहोत ही कबुली देण्यास कोणास लाजण्याचे काहीच कारण नाही. प्राचीन काळचे रामकृष्णासारखे नावाजलेले चांगले चांगले नामांकित राजे घेतले तरी त्यांनी लोकांत शिक्षण प्रसार होवा म्हणून काय स्कॉलरशिप दिल्या होत्या? या फलटण संस्थानातील आपली जनता ज्ञानहीन व अधिकारहीन अशी आहे.आपल्या लोकांच्या या स्थितीस जर कोणी जबाबदार असेल तर तो आपला धर्मच होय. देशातील शेकडा ९० लोक आज अज्ञानात व गुलामीत दिवस कंठीत आहेत. याला जर कोणी कारण असेल तर तो हिंदू धर्मच होय. इतकेच काय पण हिंदुस्थानचे स्वातंत्र्य घालविण्यास व जो कोणी परकीय राजा इकडे येईल त्याला प्रथम आश्रय देऊन पुढे त्यास शरण जाण्याला जर कोणी कारण झाले असेल तर आपला हिंदू धर्मच होय. ही पद्धत नष्ट करण्याला आपण आज काय केलं पाहिजे हा मुख्य प्रश्न आहे याबाबत रामबाण उपाय अगर तोडगा म्हणून जर सुचवायचा असेल तर तो म्हणजे राज्याची सत्ता काढून घेऊन ती प्रजेच्या ताब्यात देणे जरुरी आहे याबाबतचे माझे विचार आपणास जरा विचित्र वाटतील परंतु मला ते लपवून ठेवायचे नाहीत.इंग्रज आमदानी इकडे सुरू होऊन बरेच दिवस झाल्यानंतर लोककल्याण करणे असल्यास राजकीय सत्ता प्रजेच्या प्रतिनिधींच्या हातात असणे योग्य असे वाटू लागले त्याबाबत लोकांच्या आकांक्षा सारख्या वाढीस लागल्या त्यांना अनुसरून ज्या काही सुधारणा अंमलात आल्या आहेत त्या आपल्या या हिंदुस्थान देशात १९३७ च्या एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत परंतु मिळालेल्या या प्रजासत्ताक राज्यापासून या देशाचे काही हित झाले आहे? खरे पाहता आपल्या या देशात प्रजासत्ताक राज्यपद्धतीमुळे कवडीचा सुद्धा फरक झाल्याचे दिसत नाही परकीय इंग्रजांच्या आमदानीत जे त्यांनी केले नाही.ते हे लोक करताना दिसतात या गोष्टीबद्दल त्यांना लाज वाटत असे त्या गोष्टी आज लोकांच्या मतावर निवडून गेलेल्या लोकांनी केल्या आहेत. निशस्त्र असलेल्या कामगारांवर गोळ्या झाडून त्यांचे जीव घेणे, पोटासाठी झगडत असता संप करणे हा गुन्हा आहे.असे कायदे जे मागचे सरकार करू शकले नाही ते ही काँग्रेसची सरकारे बिनदिक्कत करीत सुटले आहेत. प्राचीन काळची गोब्राह्मण प्रतिपाल करणे ही शिकवणूक आज तरी लोकांच्या व्यवहारातून सुटली आहे काय ? आज काँग्रेसची सात प्रांतात सरकारे आहेत त्या सर्व प्रांतांचे मुख्य दिवाण ब्राह्मण आहेत म्हणजेच त्या सर्व प्रांतांची सत्ता ब्राह्मणाच्या हातात आहे.असल्या या राज्यात सर्वांचे कल्याण होईल असे म्हणणे ही बाजारगप्प आहे. त्यांच्या हातून सर्वांचे कल्याण होणे अशक्य आहे कारण जो पर्यंत या देशात गरिबांचे हितसंबंध श्रीमंत वर्गापासून भिन्न आहेत.एका वर्गाचे हितात दुसऱ्याचे अहित आहे व जिथे श्रीमंतांच्या कल्याणाची कदर करण्यास आजची काँग्रेस सरकार तत्पर आहेत अशा ठिकाणी या असल्या काँग्रेस सरकाराकरवी आमचे कल्याण होईल असा आत्मविश्वास शेतकरी व मजूर या वर्गाने बाळगणे म्हणजे या वर्गाची अधोगती होय.आज ज्या ठिकाणी क्रय विक्रय वस्तूसारखे आपल्या मताची विक्री, मतदार, श्रीमंत अशा लोकांना पैशाच्या लोभाला बळी पडून विकतात व त्यांचा खरेदीकर्ता जिथे श्रीमंत मारवाडी व गुजर आहे अशा लोकांच्या हातात सत्ता दिली असता आपले नुकसान करून गोरगरीब जनतेचे हा वर्ग कल्याण करील हे कधीच असंभवनीय नाही. असल्या लोकशाहीपेक्षा अनियंत्रित सत्ता हातात असलेला राजा परवडेल, असे म्हणण्याची पाळी आता आली आहे युरोपमध्ये ज्या प्रांतांची भरभराट चालली असे प्रांत म्हणजे जर्मनी, टर्की, इटली वगैरे होत. राजा कालस्य कारणंम या म्हणी प्रमाणे देशाच्या भरभराटीस व उन्नतीस राजाच कारण असतो.आज तरी जर्मनीचा हिटलर तारकेचा टर्कीचा मुसोलिनी व इटलीचा केमालपाशा हे आपल्या देशाच्या प्रगतीला कारण आहेत अशा राजांच्या हातात एकतंत्री सत्ता असता प्रजेचे जितके कल्याण करू शकतील तितके कल्याण मारवाडी अगर गुजर हे पैशाच्या जोरावर लोकांची मते विकत घेऊन लोकशाहीच्या नावाखाली करू शकणार नाहीत. येथील राजे फार सूज्ञ आहे. त्यांना पेन्शन देऊन संस्थान खालसा करण्यास ते हरकत घेतील असे मला वाटत नाही. उलट माझी ही सूचना मान्य करण्यास त्यांना अडचण भासणार नाही. या संस्थांची लोकसंख्या ५८००० असून वसूल मात्र अवघ्या साडेपाच लाख आहे.ज्या मुंबई प्रांताची लोकसंख्या दोन कोटी व उत्पन्न साडेबारा कोटी आहे अशा प्रांतात सुद्धा शेकडा ७५ गावांना अजून शाळा नाहीत तेव्हा असल्या थोड्या उत्पन्नाच्या संस्थानाचा ताबा ठेवून काय गळफास व्हावयाचा आहे?या फलटण संस्थानात साडेपाच लाखाने काही भागणार नाही त्यांनी हा प्रांत ब्रिटीश मुलखा सोडून द्यावा. या संस्थानातील स्पर्श मांडलेल्या लोकांना आपली गा गाऱ्हाणी राज्यापुढे मांडण्यास मोकळी असावी.प्रजेचे रक्षण करून त्यांच्या पोटापाण्याची सोय करावी. ज्या लोकांना आपल्या अस्पृश्यते मुळे कोणताही धंदा - रोजगार करता येत नाही' ज्यांना स्पृश्य लोक मानलेले लोक भांडी घासणे अगर कपडे धुणे या कामासाठी सुद्धा जिथे ठेवीत नाहीत असल्या प्रजेस आपल्या राज्यात असलेल्या पडित जमिनी सरकारने त्यांना वहिवाटीस द्याव्यात. शिक्षणासारख्या आवश्यक कामी लागणारा पैसा खर्च करण्यास या वर्गाजवळ काही नसल्याने सरकारने या वर्गाच्या लोकांना पाटी पुस्तके स्कॉलरशिप वगैरे देऊन हातभार लावावा.या संस्थानात असलेल्या कायदेमंडळात १९ माणसे आहेत. त्यात आमचा प्रतिनिधी आवश्यक घ्यावा. पूर्वी कै.आयवळे नावाच्या गृहस्थ कायदेमंडळात १९३३ पर्यंत होते त्यांच्या निधनानंतर दुसरा का निवडू नये समजत नाही.एकदा मिळालेला हक्क परत घेतला असल्यास तो आवश्यक परत मागावा.तसेच म्युनिसिपालिटया, जिल्हा बोर्ड वगैरे ठिकाणी आमच्या वर्गाचे प्रतिनिधी घेण्यात यावे. शेवटी एक कटूसत्य तुम्हाला सांगितल्याशिवाय माझ्याने राहवत नाही.आपल्या समाजात मृत मांसाहाराची अनिष्ठ रुढी प्रचारात होती. ती रुढी आपल्या समाजाच्या अवनतीस कारण झाली आहे ही आपण ताबडतोब बंद करावयास हवी आहे.हि घाण जोपर्यंत आपण काढून टाकीत नाही तोपर्यंत समतेचा झगडा झगडण्यास आपण अपात्र ठरू.तरी हे रुढी अविलंब बंद करावे. वर्षे पूर्ण होत आहेत.याच दिवशी २३ एप्रिल १९३९ रोजी या फलटण नगरीतील आम्हा अस्पृश्य बांधवांमध्ये स्पृलिंग चेतवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यांनी त्यावेळी मांडलेली मते आज ही दिशादर्शक आहेत. त्यांनी एकंदरीत संस्थानामधील अस्पृश्य जनतेच्या दैयनीय स्थितीविषयी चिंता व्यक्त करून काही उपाय योजनाही सुचवल्या होत्या.

फलटण संस्थांनाधिपतींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आगाऊच पत्र पाठवून फराळाचे निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे सायंकाळी ४ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मेसर्स गडकरी, देवरुखकर, गायकवाड, रणपिसे, सावंत,के. बी जाधव,शामराव भोळे वगैरे मंडळींसह बरोबर ४ वाजता फलटण संस्थांनाधिपतींच्या खास मोटारीने राजवाड्यात आले.तिथे राजेसाहेबांचे व त्यांचे सार्वजनिक कार्याबाबत थोडे बोलणे झाल्यानंतर थाटाची चहा पार्टी झाली चहा पार्टीनंतर राजवाड्यात डॉ.बाबासाहेब समवेत राजेसाहेब व पाहुणे मंडळी यांचा फोटो झाला. नंतर सायंकाळी ५ वाजता राजवाड्यापासून जंगी मिरवणूक निघून ती सभेच्या मंडपापर्यंत आली.सभेसाठी भव्य मंडप स्टेज तयार केला होता. संस्थानातील सर्व बडी बडी स्त्री पुरुष मंडळी सभेस मुद्दाम आली होती. सुरुवातील स्वागत पद्ये व पोवाडे झाल्यानंतर सभेचे स्वागताध्यक्ष श्री. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेबांचे व जमलेल्या मंडळींचे स्वागत करून आपल्या समाजाने संघटित राहणे किती हिताचे व महत्त्वाचे आहे याचे वर्णन केले. शेवटी डॉ. बाबासाहेबांनी परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती केली. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. बाबासाहेब स्थानापन्न झाले. सभेसाठी फलटण संस्थानातील व संस्थांना बाहेरील असा सुमारे दहा बारा हजार जमाव जमला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलण्यास उठले ते म्हणाले.' मी फलटण संस्थानातील अस्पृश्य मानलेल्या लोकांच्या परिषदेसाठी जरी इथे आलो असलो तरी सर्वसाधारण जनतेचे कर्तव्य काय, आज जगात काय चालले आहे इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.सर्वसाधारण जनता ही सध्या लोकशाहीची भाषा बोलत असून संस्थानात व संस्थांनाबाहेर लोकशाहीच्या तत्त्वावर सुधारणा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे अशावेळी संस्थानिकांनी ही आपला दृष्टिकोन बदलून प्रजेला जितके अधिक अधिकार देण्यासारखे असतील तेवढे दिले पाहिजेत. आजची संस्थाने ही मागच्या राज्यांची अवशेष आहेत पूर्वीच्या काळी राजांना जर कोणती शिकवणूक मिळत असेल तर ती म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपाल करणे एवढेच होय.! गोब्राह्मण प्रतिपालक हे त्यावेळच्या राजाचे मुख्य कर्तव्य समजले जात असे. गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे गायींना चारा घालून ब्राह्मण जातीचे रक्षण केले म्हणजे राजांचे राजा म्हणून दुसरे कर्तव्यच शिल्लक राहिले नाही असे समजण्यात येई.गो - ब्राह्मण प्रतिपालाखेरीज राजाने दुसरे काही न केले तरी चालत असे. आज सर्व संस्थांनात राहणाऱ्या लोकांच्या परिस्थितीकडे पाहिल्यास त्यांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा मोठी चांगली नाही याचा दोष जर कोणाकडे जाणार असलाच तर तो हिंदू धर्माच्या वरील शिकवणीकडे जाईल. चाणक्यनीती, मनुस्मृती वगैरे ग्रंथांचे अवलोकन केले तर आपणास असे दिसून येईल की त्यांनी राजाचे कर्तव्य म्हणजे खेड्यापाड्यातून शाळा काढुन लोकांना सुविद्य करणे अगर लोकहिताच्या गोष्टी करणे यांचा कोठेच मागमूस ही आढळणार नाही.या सर्व गोष्टी आपण इंग्रजांपासून शिकलो आहोत ही कबुली देण्यास कोणास लाजण्याचे काहीच कारण नाही. प्राचीन काळचे रामकृष्णासारखे नावाजलेले चांगले चांगले नामांकित राजे घेतले तरी त्यांनी लोकांत शिक्षण प्रसार होवा म्हणून काय स्कॉलरशिप दिल्या होत्या? या फलटण संस्थानातील आपली जनता ज्ञानहीन व अधिकारहीन अशी आहे.आपल्या लोकांच्या या स्थितीस जर कोणी जबाबदार असेल तर तो आपला धर्मच होय. देशातील शेकडा ९० लोक आज अज्ञानात व गुलामीत दिवस कंठीत आहेत. याला जर कोणी कारण असेल तर तो हिंदू धर्मच होय. इतकेच काय पण हिंदुस्थानचे स्वातंत्र्य घालविण्यास व जो कोणी परकीय राजा इकडे येईल त्याला प्रथम आश्रय देऊन पुढे त्यास शरण जाण्याला जर कोणी कारण झाले असेल तर आपला हिंदू धर्मच होय. ही पद्धत नष्ट करण्याला आपण आज काय केलं पाहिजे हा मुख्य प्रश्न आहे याबाबत रामबाण उपाय अगर तोडगा म्हणून जर सुचवायचा असेल तर तो म्हणजे राज्याची सत्ता काढून घेऊन ती प्रजेच्या ताब्यात देणे जरुरी आहे याबाबतचे माझे विचार आपणास जरा विचित्र वाटतील परंतु मला ते लपवून ठेवायचे नाहीत.इंग्रज आमदानी इकडे सुरू होऊन बरेच दिवस झाल्यानंतर लोककल्याण करणे असल्यास राजकीय सत्ता प्रजेच्या प्रतिनिधींच्या हातात असणे योग्य असे वाटू लागले त्याबाबत लोकांच्या आकांक्षा सारख्या वाढीस लागल्या त्यांना अनुसरून ज्या काही सुधारणा अंमलात आल्या आहेत त्या आपल्या या हिंदुस्थान देशात १९३७ च्या एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत परंतु मिळालेल्या या प्रजासत्ताक राज्यापासून या देशाचे काही हित झाले आहे? खरे पाहता आपल्या या देशात प्रजासत्ताक राज्यपद्धतीमुळे कवडीचा सुद्धा फरक झाल्याचे दिसत नाही परकीय इंग्रजांच्या आमदानीत जे त्यांनी केले नाही.ते हे लोक करताना दिसतात या गोष्टीबद्दल त्यांना लाज वाटत असे त्या गोष्टी आज लोकांच्या मतावर निवडून गेलेल्या लोकांनी केल्या आहेत. निशस्त्र असलेल्या कामगारांवर गोळ्या झाडून त्यांचे जीव घेणे, पोटासाठी झगडत असता संप करणे हा गुन्हा आहे.असे कायदे जे मागचे सरकार करू शकले नाही ते ही काँग्रेसची सरकारे बिनदिक्कत करीत सुटले आहेत. प्राचीन काळची गोब्राह्मण प्रतिपाल करणे ही शिकवणूक आज तरी लोकांच्या व्यवहारातून सुटली आहे काय ? आज काँग्रेसची सात प्रांतात सरकारे आहेत त्या सर्व प्रांतांचे मुख्य दिवाण ब्राह्मण आहेत म्हणजेच त्या सर्व प्रांतांची सत्ता ब्राह्मणाच्या हातात आहे.असल्या या राज्यात सर्वांचे कल्याण होईल असे म्हणणे ही बाजारगप्प आहे. त्यांच्या हातून सर्वांचे कल्याण होणे अशक्य आहे कारण जो पर्यंत या देशात गरिबांचे हितसंबंध श्रीमंत वर्गापासून भिन्न आहेत.एका वर्गाचे हितात दुसऱ्याचे अहित आहे व जिथे श्रीमंतांच्या कल्याणाची कदर करण्यास आजची काँग्रेस सरकार तत्पर आहेत अशा ठिकाणी या असल्या काँग्रेस सरकाराकरवी आमचे कल्याण होईल असा आत्मविश्वास शेतकरी व मजूर या वर्गाने बाळगणे म्हणजे या वर्गाची अधोगती होय.आज ज्या ठिकाणी क्रय विक्रय वस्तूसारखे आपल्या मताची विक्री, मतदार, श्रीमंत अशा लोकांना पैशाच्या लोभाला बळी पडून विकतात व त्यांचा खरेदीकर्ता जिथे श्रीमंत मारवाडी व गुजर आहे अशा लोकांच्या हातात सत्ता दिली असता आपले नुकसान करून गोरगरीब जनतेचे हा वर्ग कल्याण करील हे कधीच असंभवनीय नाही. असल्या लोकशाहीपेक्षा अनियंत्रित सत्ता हातात असलेला राजा परवडेल, असे म्हणण्याची पाळी आता आली आहे युरोपमध्ये ज्या प्रांतांची भरभराट चालली असे प्रांत म्हणजे जर्मनी, टर्की, इटली वगैरे होत. राजा कालस्य कारणंम या म्हणी प्रमाणे देशाच्या भरभराटीस व उन्नतीस राजाच कारण असतो.आज तरी जर्मनीचा हिटलर तारकेचा टर्कीचा मुसोलिनी व इटलीचा केमालपाशा हे आपल्या देशाच्या प्रगतीला कारण आहेत अशा राजांच्या हातात एकतंत्री सत्ता असता प्रजेचे जितके कल्याण करू शकतील तितके कल्याण मारवाडी अगर गुजर हे पैशाच्या जोरावर लोकांची मते विकत घेऊन लोकशाहीच्या नावाखाली करू शकणार नाहीत. येथील राजे फार सूज्ञ आहे. त्यांना पेन्शन देऊन संस्थान खालसा करण्यास ते हरकत घेतील असे मला वाटत नाही. उलट माझी ही सूचना मान्य करण्यास त्यांना अडचण भासणार नाही. या संस्थांची लोकसंख्या ५८००० असून वसूल मात्र अवघ्या साडेपाच लाख आहे.ज्या मुंबई प्रांताची लोकसंख्या दोन कोटी व उत्पन्न साडेबारा कोटी आहे अशा प्रांतात सुद्धा शेकडा ७५ गावांना अजून शाळा नाहीत तेव्हा असल्या थोड्या उत्पन्नाच्या संस्थानाचा ताबा ठेवून काय गळफास व्हावयाचा आहे?या फलटण संस्थानात साडेपाच लाखाने काही भागणार नाही त्यांनी हा प्रांत ब्रिटीश मुलखा सोडून द्यावा. या संस्थानातील स्पर्श मांडलेल्या लोकांना आपली गा गाऱ्हाणी राज्यापुढे मांडण्यास मोकळी असावी.प्रजेचे रक्षण करून त्यांच्या पोटापाण्याची सोय करावी. ज्या लोकांना आपल्या अस्पृश्यते मुळे कोणताही धंदा - रोजगार करता येत नाही' ज्यांना स्पृश्य लोक मानलेले लोक भांडी घासणे अगर कपडे धुणे या कामासाठी सुद्धा जिथे ठेवीत नाहीत असल्या प्रजेस आपल्या राज्यात असलेल्या पडित जमिनी सरकारने त्यांना वहिवाटीस द्याव्यात. शिक्षणासारख्या आवश्यक कामी लागणारा पैसा खर्च करण्यास या वर्गाजवळ काही नसल्याने सरकारने या वर्गाच्या लोकांना पाटी पुस्तके स्कॉलरशिप वगैरे देऊन हातभार लावावा.या संस्थानात असलेल्या कायदेमंडळात १९ माणसे आहेत. त्यात आमचा प्रतिनिधी आवश्यक घ्यावा. पूर्वी कै.आयवळे नावाच्या गृहस्थ कायदेमंडळात १९३३ पर्यंत होते त्यांच्या निधनानंतर दुसरा का निवडू नये समजत नाही.एकदा मिळालेला हक्क परत घेतला असल्यास तो आवश्यक परत मागावा.तसेच म्युनिसिपालिटया, जिल्हा बोर्ड वगैरे ठिकाणी आमच्या वर्गाचे प्रतिनिधी घेण्यात यावे. शेवटी एक कटूसत्य तुम्हाला सांगितल्याशिवाय माझ्याने राहवत नाही.आपल्या समाजात मृत मांसाहाराची अनिष्ठ रुढी प्रचारात होती. ती रुढी आपल्या समाजाच्या अवनतीस कारण झाली आहे ही आपण ताबडतोब बंद करावयास हवी आहे.हि घाण जोपर्यंत आपण काढून टाकीत नाही तोपर्यंत समतेचा झगडा झगडण्यास आपण अपात्र ठरू.तरी हे रुढी अविलंब बंद करावे.

माहिती संकलन
आयु. सोमीनाथ घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)