Saturday, September 12, 2026
Homeफलटणसेवापूर्ती निमित्त आयु.विठ्ठल निकाळजे सर यांचा सत्कार संपन्न

सेवापूर्ती निमित्त आयु.विठ्ठल निकाळजे सर यांचा सत्कार संपन्न


सोनगाव (दि. २२ एप्रिल २०२६) : सोनगाव येथील ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने आयु. विठ्ठल बाबुराव निकाळजे सर यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार समारंभ बुधवारी उत्साहात पार पडला. गावचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच श्री जयाप्पा बेलदार यांच्या हस्ते निकाळजे यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत श्री हनुमंत थोरात, श्री बाळासाहेब पिंगळे, श्री बाबासो लवटे, श्री पोपटराव बुरुंगले, श्री धनाजी मोरे (गुरुजी), श्री बाळासाहेब ओवाळ, श्री अरविंद लवटे, श्री लालासो घोलप, श्री चंद्रकांत निकाळजे, श्री राहुल बेलदार, श्री अरुण लांडगे, श्री शिवाजी भोसले यांच्यासह समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यात विठ्ठल निकाळजे यांच्या सेवाकाळातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कार्याचा गौरव करण्यात आला. गावाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. यावेळी वक्त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या अनुभवाचा समाजाला पुढेही लाभ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरीत्या पार पडले असून ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments