Thursday, September 10, 2026
Homeफलटणबहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहात साजरा

बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहात साजरा

बहुजन समाज पक्षाचे शहराध्यक्ष विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहात साजरा

दुधेबावी (प्रतिनिधी) : बहुजन समाज पक्षाचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष तथा सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आयु. विद्याधर किरतावडे यांचा वाढदिवस दुधेबावी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांना वंदन करून तसेच दीप, धूप व पुष्प अर्पण करून करण्यात आली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयुष्यमान महावीर भालेराव यांच्या हस्ते बुद्धपूजा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण, पंचशील, बुद्ध पूजा भिमस्मरण, भीमस्तुती ने झाली.कार्यक्रमात विविध मान्यवरांनी किरतावडे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्याधर किरतावडे हे अत्यंत मनमिळावू, मोकळ्या मनाचे आणि सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात ते सातत्याने कार्यरत असून समाजातील लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी ते झटत असतात. कोणत्याही पदाचा गर्व न बाळगता ते सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे वावरतात. त्यांची विनम्रता आणि संवेदनशीलता ही त्यांची विशेष ओळख आहे.”

भारतीय बौद्ध महासभेचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, “किरतावडे हे बौद्ध धम्माच्या आचार-विचारांनुसार निर्मळ जीवन जगत आहेत. कोणताही कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सुनियोजित पद्धतीने पार पडावा यासाठी त्यांचा विशेष आग्रह असतो. झालेल्या चुकांबाबत ते प्रांजळपणे मत व्यक्त करून त्या दुरुस्त करण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करतात. त्यांच्या दिलदार आणि मोकळ्या स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत.”

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आमचे बंधू विद्याधर किरतावडे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असून बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांवर त्यांची अपार श्रद्धा आहे. महापुरुषांच्या विचारांनुसार ते आपले जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत आणि त्यांना उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो, ही तथागत चरणी प्रार्थना आहे.”

बौद्धाचार्य आयुष्यमान महावीर भालेराव यांनी किरतावडे यांच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “बुद्धबल, धम्मबल आणि संघबलाच्या आधारे किरतावडे सरांच्या मनातील सर्व सदिच्छा पूर्ण होवोत आणि त्यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक व्हावे.”
कार्यक्रमाची सांगता सरणतय घेऊन करण्यात आली. यावेळी ॲड. चंद्रशेखर मोरे परिवार, जगताप परिवार, किरतावडे परिवार तसेच भारतीय बौद्ध महासभा परिवार (BBM Family) मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी आयु. विद्याधर किरतावडे यांना वाढदिवसानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments