Thursday, September 10, 2026
Homeफलटणमंदिर इनाम जमीन कायद्याला स्थगिती; पुढील रणनीतीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाची उद्या फलटणमध्ये...

मंदिर इनाम जमीन कायद्याला स्थगिती; पुढील रणनीतीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाची उद्या फलटणमध्ये बैठक

मंदिर इनाम जमीन कायद्याला स्थगिती; पुढील रणनीतीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाची उद्या फलटणमध्ये बैठक

फलटण | प्रतिनिधी :- राज्यातील मंदिर इनाम जमिनींच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून महाराष्ट्र मंदिर इनाम जमीन कायद्याला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मंदिर विश्वस्त, पुजारी, सेवेकरी आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा, संघटनात्मक भूमिका आणि मंदिरांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ, फलटण तालुका विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्वामी विवेकानंदनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात होणार आहे. राज्य शासनाने कायद्याला दिलेल्या स्थगितीनंतर निर्माण झालेली परिस्थिती, मंदिरांच्या जमिनींचे संरक्षण, मंदिर व्यवस्थापनासमोरील विविध अडचणी, शासनाकडे करावयाच्या पुढील मागण्या तसेच संघटनात्मक बळकटीकरण यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
मंदिरांच्या हक्कांचे संरक्षण, धार्मिक संस्थांचे अस्तित्व आणि भविष्यातील नियोजन यासाठी या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिर इनाम जमिनींच्या विषयावर पुढील आंदोलनाची दिशा, कायदेशीर बाबी आणि शासनाशी संवाद यावरही विचारविनिमय होणार असल्याची माहिती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने फलटण तालुक्यातील सर्व मंदिर विश्वस्त, पुजारी, व्यवस्थापक, सेवेकरी आणि मंदिराशी संबंधित घटकांना या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिरांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे भूमिका निश्चित करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments