Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटणमध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटणमध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण (प्रतिनिधी) — आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात सध्या समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा रंगली आहे. नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि तरुणवर्ग या सर्व घटकांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून, “फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी दादांचे नेतृत्व आवश्यक आहे,” असे मत सर्वत्र व्यक्त केले जात आहे.

गेल्या काही वर्षांत नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांची कार्यशैली लोकांपर्यंत पोहोचली असून, नागरिकांशी थेट संवाद साधणे आणि समस्यांवर झटपट निर्णय घेण्याची वृत्ती यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपलेपणा वाढला आहे.

प्रचार अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वीच समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या वैयक्तिक भेटीगाठींना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः युवक आणि महिला मतदार वर्ग त्यांच्या मागे ठामपणे उभा असल्याचे दिसत आहे.

शहराच्या विकासासाठी स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन, दर्जेदार रस्ते, व्यापाऱ्यांसाठी सुविधांची वाढ, प्रलंबित प्रकल्पांना पूर्णत्व आणि नव्या विकास योजनांची अंमलबजावणी ही आपली मुख्य प्राधान्ये असल्या त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, विरोधकांच्या प्रचाराला अद्याप गती मिळालेली नसताना समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची लाट शहरभर पसरत असून, येत्या काही दिवसांत या लाटेला आणखी वेग मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दादांची उमेदवारी प्रभावी ठरणार, अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments