
लालू प्रसाद यांचा थोरला मुलगा तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी या संदर्भातली माहिती दिलीय. 6 वर्षांसाठी तेजप्रताप यादव यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलंय… पाहुयात यासंदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेजप्रताप यांची कुटुंब आणि पक्षातून हकालपट्टी केलीय. तेजप्रताप यादव यांच्या फेसबुक अकाऊंटवरून त्यांचा एका तरूणीसोबतचा फोटो शेअर करण्यात आला होता. हा फोटो शेअर करत तेजप्रताप यांनी रिलेशेनशिपसंदर्भात भाष्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या याच पोस्टनंतर त्यांची कुटुंब आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तेजप्रताप यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर लगेचच लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली.
राष्ट्रीय जनता दलातून तेजप्रतापांची हकालपट्टी
वैयक्तिक जीवनात नैतिक मुल्यांकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक न्यायासाठी आम्ही करत असलेला संघर्ष कमकुवत होतो. तेजप्रताप यादव यांचं कृत्यं आणि वागणं हे आमच्या कौटुंबिक मुल्य आणि संस्काराच्याविरोधात आहे. त्यामुळे त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलंय. आता पक्ष आणि कुटुंबात त्यांची कोणतीही भूमिका राहणार नाही. त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात येत आहे. तेजप्रताप यांच्या फेसबुक अकाऊंटर पोस्ट करण्यात आलेल्या पोस्टनंतर ते अडचणीत आलेत. आणि त्यामुळेच त्यांच्यावर हीकारवाई करण्यात आलीय.
तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी
शनिवारी तेजप्रताप यादव यांच्या फेसबुक
अकाउंटवरून एक फोटो शेअर करण्यात
आला
या फोटोत तेजप्रताप हे एका तरूणीसोबत
दिसत आहेत
तेजप्रताप यादव यांच्यासोबत असेलल्या
तरुणीचं नाव अनुष्का यादव असल्याची
माहिती
12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत
असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात
आला होता
दरम्यान काही तासानंतर ही पोस्ट
फेसबुकवरून डिलिट करण्यात
आली
त्यानंतर माझं फेसबुक अकाऊंट हॅक
करण्यात आल्याचं तेजप्रताप यादव
यांनी सांगितलं
फोटो एआयच्या मदतीनं तयार करण्यात
आल्याचं स्पष्टीकरणही तेजप्रताप यांनी
दिलं
लालू प्रसाद यांचे साले म्हणजेच साधू यादव यांनी लालू प्रसाद यांनी घेतलेल्या निर्णयानंतर तेजप्रतापसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर टीका केलीय. तेजप्रताप मागील अनेक दिवसांपासून एका तरुणीसोबत राहत होता. लालू प्रसाद यादव यांना माहिती असूनही त्यांनी तेजप्रतापला 5 करोडचं हॉटेल बूक करून दिल्याचा आरोप साधू यादव यांनी केलाय.लालू प्रसाद यांनी त्यांच्या मुलाला कुटुंब आणि पक्षातून काढलं याच बिहारशी काय संबंध? यादव समाजातील एखादी नेता सक्षम असेल तर त्याला मुख्यमंत्री बनवणार असं लालू प्रसाद यादव म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी तो चेहरा जाहीर करावा जन सुराज पक्ष पाठिंबा देईल असं प्रशांत किशोर यांनी म्हटलंय.
कोण आहे अनुष्का?
तेज प्रताप आणि अनुष्का यादव यांच्यातील नात्यावरून 24 मे पासून सोशल मीडियावर गोंधळ सुरू आहे. अनुष्कासोबतच्या त्याच्या नात्याचा खुलासा झाल्यानंतर, लोक प्रतिक्रिया देत आहेत की जेव्हा ते दोघेही 12 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा त्याने 2018 मध्ये ऐश्वर्या रायशी लग्न का केले? लालू यादव नेहमीच सामाजिक न्यायाबद्दल बोलतात, या नात्यामुळे त्याला दुखापत झाली नाही का? अनेक लोक तर अशी प्रतिक्रिया देत आहेत की ऐश्वर्या राय त्याला तुरुंगात पाठवू शकते. याचे कारण म्हणजे ऐश्वर्या राय ही तेज प्रतापची विवाहित पत्नी आहे आणि हिंदू विवाह कायद्यानुसार दुसरे लग्न बेकायदेशीर आहे. तथापि, अनुष्का यादव आणि तेज प्रताप यादव यांचे नाते कोणत्या प्रकारचे आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही.
बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे तेजप्रताप यांची ही पोस्ट बिहारच्या राजकारणात वादंग निर्माण करू शकते. तसंच विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून लालू प्रसाद यादव यांना घेरलं असतं त्यामुळेच लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची चर्चा आहे.