Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाचा 2024 चा शाहिरी क्षेत्रातला पुरस्कार महाराष्ट्राचे लोकशाहीर राजेंद्र...

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाचा 2024 चा शाहिरी क्षेत्रातला पुरस्कार महाराष्ट्राचे लोकशाहीर राजेंद्र कांबळे यांना जाहीर

फलटण : भिम शाहीर व शिवशाहीर यापासून सुरुवात करून महाराष्ट्राचे लोकशाहीर पर्यंतच्या प्रवास करणारे माळशिरस तालुक्यातील खुडूस गावचे सुपूत्र पहाडी आवाजाचे वरदान असलेले सामाजिक क्षेत्रात तळमळीने प्रबोधनाचे प्रामाणिकपणे काम करणारे शाहीर राजेंद्र कांबळे यांना या वर्षीच्या महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाचा 2024 चा शाहिरी क्षेत्रातला पुरस्कार महाराष्ट्राचे लोकशाहीर राजेंद्र कांबळे यांना जाहीर झाला आहे

महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे दिलेले जाणारे सांस्कृतिक पुरस्काराचा घोषणा करण्यात आली आहे . यामध्ये महाराष्ट्राचे लोकशाही शाहिरी क्षेत्रात नावाजलेले माळशिरस तालुक्यातील खुडूस येथील सामाजिक चळवळीतला बुलंद आवाज लोकशाहीर राजेंद्र कांबळे यांना शाहिरी पुरस्कार जाहीर झाला आहे . सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १२ पुरस्कारांच्या निवडी जाहीर केल्या . या निवडीमध्ये शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या नावाचा समावेश आहे . पुरस्काराचे स्वरूप हे तीन लक्ष रोख , मानपत्र व मानचिन्ह असे आहे . चार सप्टेंबर रोजी मुंबई येथे रवींद्र नाटय मंदिर प्रभादेवी दादर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री व सुधीर मुनगंटीवार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे .

. . लोकशाहीर राजेंद्र कांबळे यांना लहानपणापासून शाहिरीचा छंद असून त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्याबरोबर पोवाडे गायन केले आहेत

राज्य सांस्कृतिक पुरस्कार” समितीने निवड केल्यानुसार सन २०२४ यावर्षासाठी खालीलप्रमाणे पुरस्कार्थीची नावे या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात येत आहेत.

अ.क्र.

कलाक्षेत्र

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे नाव

१ )नाटक

श्रीमती विशाखा सुभेदार

२ )उपशास्त्रीय संगीत

डॉ. विकास कशाळकर

)कंठसंगीत

श्री. सुदेश भोसले

४)लोककला

श्री. अभिमन्यू धर्माजी सावदेकर

५ )शाहिरी

शाहीर राजेंद्र कांबळे

६ ) नृत्य

श्रीमती सोनिया परचुरे

७ )चित्रपट

श्रीमती रोहिणी हटंगडी

.८ ) किर्तन/समाजप्रबोधन

श्री. संजयनाना धोंडगे

९ )वाद्यसंगीत

श्री. पांडुरंग मुखडे

१० ) कलादान

श्री. नागेश सुर्वे (ऋषीराज)

११) तमाशा

श्री. कैलास मारुती सावंत

१२.आदिवासी गिरीजन

श्री शिवराम शंकर घुटे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments