Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रवेब वॉच: अँग्री यंग मेन : सलीम-जावेद जोडीचा ‘कोरडा’ नॉस्टॅल्जिया

वेब वॉच: अँग्री यंग मेन : सलीम-जावेद जोडीचा ‘कोरडा’ नॉस्टॅल्जिया

[ad_1]

मुंबई2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘जब तक बैठने को ना कहां जाये, शराफत से खडे रहो’ ‘कितने आदमी थे..?’ ‘मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता..’ ‘डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकीन हैं..’

हे डायलॉग कोणत्या सिनेमातील आहेत, असा प्रश्न करणं म्हणजे, ‘तुम्हारा नाम क्या हैं बसंती?’ हे विचारण्यासारखं आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सिनेमे नायक-नायिकांच्या नावाने ओळखले जात होते, ओळखले जातात. आजही असे मोजकेच दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या नावावर सिनेमे बघितले जातात. सिनेमाची कथा-पटकथा-संवाद कोणी लिहिले आहेत, याबद्दल कोणीही चौकशी करत नसायचे. ज्यांच्या नावावर सिनेमे चालतात, त्यांनाच मुबलक पैसे मिळतात. त्यामुळं सिनेमांच्या टायटलमध्ये पटकथाकारांचे नाव ठळकपने दाखवले जात नव्हते. अशा काळात सलीम-जावेद यांनी पटकथा लिहिण्यास सुरूवात केली आणि सिनेमाच्या पोस्टरवर आपले नाव प्रामुख्याने दिसेल, अशा क्लुप्त्या केल्या. ‘नेल्ला नेरम’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘हाथी मेरे साथी’ करताना या जोडीला संवाद लिहिण्याचे काम मिळाले. त्यानंतर ‘सीता और गीता’, ‘जंजीर’, ‘यादो की बारात’, ‘हाथ की सफाई’, ‘मजबूर’ असे सिनेमे तीन वर्षांत रिलीज झाले आणि सलीम-जावेद यांचे नाव आदराने घेतले जाऊ लागले. ‘शोले’ आणि ‘दीवार’ हे दोन सिनेमे एकाच वेळी शूट केले जात होते आणि एकाच वर्षात रिलीज झाले. त्यानंतर पटकथा लिहिण्यासाठी सलीम-जावेद यांनी पैसे किती मागितले असतील? अमिताभ बच्चन यांच्या मानधनापेक्षा जास्त पैसे मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली आणि ती निर्मात्यांनी मान्य केली! ‘त्रिशूल’, ‘डॉन’, ‘काला पत्थर’मुळे त्यांच्या यशाची कमान चढत गेली, तरी ‘इमान धरम’ हा सिनेमा कोसळला. ‘शोले’नंतर ‘शान”ने भ्रमनिरास केला.“शक्ती’, ‘क्रांती’, ‘मिस्टर इंडिया’ असे काही सिनेमे गाजले, पण तो पर्यंत सलीम-जावेद यांच्या लेखणीतील जादू ओसरली होती. हमखास यशाचा फॉर्म्युला कुठेतरी हरवला होता. सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी एकट्याने पटकथा लिहिलेले काही सिनेमे आले. ‘सिलसिला’पासून जावेद अख्तर यांनी गीतकार या नात्याने करिअर सुरू केले. या दोघांच्या पटकथा लेखनाबद्दल अनेक सिनेरसिकांच्या मनात प्रश्न आहेत, उत्सुकता आहे.

अशा सलीम-जावेद या द्वयीवर ‘अँग्री यंग मेन’ ही तीन भागांची डॉक्युमेंटरी वेब सिरीज ‘प्राइम’वर नुकतीच रिलीज झाली आहे. या दोघांच्या पुढच्या पिढीने म्हणजेच सलमान-अरबाज-सोहेल खान, फरहान-झोया अख्तर निर्माण केलेली ही सिरीज बघताना नॉस्टॅल्जियाचा अनुभव येतो, कारण गाजलेल्या सिनेमांतील गाजलेले शॉट दिसतात. सलीम खान आणि जावेद अख्तर (एकत्र न येता) त्यांच्या घरी त्या बद्दलच्या प्रश्नांना उत्तरे देतात. सलीम खान म्हणतात ते खरे आहे… ‘गंगा जमुना, मदर इंडियाची पटकथा या सारखीच होती.. एक मुलगा गँगस्टर आणि एक पोलिस. यावर किमान २५ ते ३० सिनेमे असतीलही. कथा तीच असली, तरी पटकथा वेगळी होती.” अभिनेता शरद सक्सेना म्हणतो, ‘त्या काळी गॅस कनेक्शनसाठी ६ वर्षे लागायची, रेशन कार्डसाठी लाइन लावावी लागायची. सर्वसामान्य माणूस असंतुष्ट होता. ती आग भारताच्या प्रत्येक युवकामध्ये होती, तीच नस सलीम-जावेद यांनी नेमकी पकडली.” गाजलेल्या सिनेमांबद्दल अमिताभ-जया, शाहरुख-आमीर, फरहान-सलमान, शबाना-हेलन हे दोन-तीन मिनिटांचे बाईट देतात. पण, तीन भागांची वेब सिरीज बघितल्यावर ‘सुनहरी यादें’शिवाय प्रेक्षकांच्या हाती काहीच लागत नाही.

युवा पटकथा लेखक / लेखिका या डॉक्युमेंटरीकडे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघू शकत नाहीत. कारण ‘अँग्री यंग मेन’मधील बराच वेळ सलीम आणि जावेद यांचे पूर्वीचे आणि आत्ताचे व्यक्तिगत जीवन दाखवण्यात गेला आहे. दोन्ही पटकथा लेखकांना वडिलांबद्दल विशेष आस्था नव्हती, आईबद्दल विशेष प्रेम होते, त्यामुळे त्याचे प्रतिबिंब त्यांनी लिहिलेल्या कथा-पटकथामध्ये पडणे स्वाभाविक आहे. परंतु, सलीम यांनी दोन विवाह कसे केले? दुसरी पत्नी त्यांच्या घरामध्ये कशी मिसळून गेली आहे? जावेद अख्तर यांची दुसरी पत्नी शबाना पहिल्या पत्नीबरोबर कसे जुळवून घेते? जावेद यांच्या मुलांनी शबानाला आपलेसे कसे केले? याबद्दल बराच खल केला गेला आहे, ज्याचा डॉक्युमेंटरीशी काही संबंध नाही. ‘शोले’ या उत्तम पटकथेनंतर तोच फॉर्म घेऊन ‘शान’ची शहरातली पटकथा का लिहिली? त्यापेक्षा हटके काही का करावे वाटले नाही, ‘शान’मध्ये नेमके काय चुकले, यावर त्यात चर्चा होत नाही. ‘इमान धरम’बद्दल सलीम आणि जावेद यांनी एक – दोन विधाने केली आहेत. पण एकूणच, पटकथाकारांच्या डॉक्युमेंटरीलाच पटकथा नाही, हीच या सिरीजची सगळ्यात मोठी उणीव आहे. कोणताही नवा पटकथाकार ही डॉक्युमेंटरी बघून काहीच शिकू शकणार नाही.

जगात अनेक विषयांवर उत्तमोत्तम डॉक्युमेंटरी बनवल्या जातात. ‘द स्पिकिंग हँड’ बघून तुम्ही तबला वादनाबद्दल बरेच काही शिकू शकता, ‘ख्याल’ डॉक्युमेंटरीतून तुम्हाला वेगवेगळ्या घराण्यांच्या राग-संगीत-गायन शैलीबद्दल माहिती मिळते. आल्फ्रेड हिचकॉक, मार्टिन स्कॉर्सेसी, स्टीव्हन स्पीलबर्ग अशा अनेक उत्तम दिग्दर्शकांची विचार प्रक्रिया त्यांच्यावर केलेल्या डॉक्युमेंटरीतन उलगडते. पण, ‘अँग्री यंग मेन’ बघितल्यावर, जुन्या ट्रंका उघडून त्यातील जुन्या कपड्यांवर हात फिरवल्याचा फक्त आभास निर्माण होतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments