Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रवेध मुत्सद्देगिरीचा...: 'पास्कल ॲलन नझरेथ' महात्मा गांधींचा जागतिक दूत

वेध मुत्सद्देगिरीचा…: ‘पास्कल ॲलन नझरेथ’ महात्मा गांधींचा जागतिक दूत

वेध मुत्सद्देगिरीचा…:  ‘पास्कल ॲलन नझरेथ’ महात्मा गांधींचा जागतिक दूत

[ad_1]

  • Marathi News
  • Opinion
  • ‘Pascal Allan Nazareth’ World Ambassador Of Mahatma Gandhi Rasik Article By Dr. Rohan Chaudhary

डॉ. रोहन चौधरी13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

जगाला महात्मा गांधींची ओळख १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटामुळे झाली, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले होते. त्यावरुन ऐन निवडणुकीत नवा उलटसुलट चर्चाही झाली. दलाई लामा यांची प्रस्तावना लाभलेले, ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि बराक ओबामा यांनी नावाजलेले, पास्कल ॲलन नझरेथ लिखित ‘गांधीज् आउटस्टँडिंग लीडरशिप’ आणि ‘गांधी : द सोल फोर्स वॉरिअर’ ही पुस्तके नजरेखालून घातली असती, तर कदाचित ‘ते’ विधान त्यांनी केले नसते. विशेष म्हणजे, खुद्द पास्कल यांनीच गुजरातीमध्ये भाषांतरित झालेली ही पुस्तके मोदींना भेट दिली होती.

असो. मुद्दा फक्त एखाद्या विधानाचा नाही, तर एकूणच आपल्या व्यवस्थेतील इतिहासाकडे बघण्याच्या दोषाचा आहे. हा दृष्टिदोष दूर करायचा असेल, तर वयाची ३५ वर्षे मुत्सेद्दीगिरीच्या क्षेत्रात राहूनही निवृत्तीनंतर पास्कल यांना म. गांधींवर पुस्तके लिहावीशी का वाटली, या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल.

साधारणतः कोणत्याही मुत्सद्द्याच्या कारकिर्दीच्या यशाचे मूल्यमापन हे त्याने कोणत्या देशात आपली सेवा बजावली आहे, यावरून होते. आपल्याकडे अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि युरोपियन देशांमधील सेवा हे या यशाचे मानक मानले जाते. परंतु, यशाचे हे मानदंड किती चुकीचे आहेत, हे पास्कल यांच्या कारकिर्दीवरून लक्षात येते. आणि त्यांच्या याच कारकिर्दीत गांधीवादाची देखील बीजे रोवली आहेत.

जागतिक राजकारणात १९५९ मध्ये पहिले जग, दुसरे जग आणि तिसरे जग अशी ठळक विभागणी झाली होती, तेव्हा पास्कल यांनी परराष्ट्र सेवेत प्रवेश केला. तिसऱ्या जगाचे नेतृत्व हा भारतीय परराष्ट्र धोरणाचा मुख्य गाभा होता. त्याला मानवतावादाचे आयाम होते. साहजिकच त्या देशांत कार्यरत असणाऱ्या सर्वच मुत्सद्द्यांचे प्रमुख कार्य भारतीय नेतृत्वाला बळकटी देणे हे होते. पास्कल यांनी केवळ तेवढेच केले नाही, तर त्याला गांधीवादाचे वैचारिक अधिष्ठानही प्राप्त करून दिले. जपान, रंगून, घाना, लिबेरिया, टोगो, इजिप्त, मेक्सिको, ग्वाटेमाला, एल साल्व्हाडोर आणि पेरू येथे त्यांनी आपली सेवा बजावली. त्या काळात या देशांत काम करणे किती जिकिरीचे होते, हे कल्पनेच्या पलीकडे आहे.

सामाजिक शास्त्रातील कोणत्याही समस्या जेथे सहज सापडतील, अशा परिस्थितीत आपली जबाबदारी पार पाडणे हेच मुळात कौतुकास्पद आहे. विशेषतः १९८० मध्ये लिबेरियात राष्ट्राध्यक्ष विल्यम टॉलबॉर्ट यांच्याविरोधात जमावाने केलेले बंड आणि क्रूरपणे केलेल्या त्यांच्या हत्येनंतर तिसऱ्या जगाचा जागतिक व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. शीतयुद्धामुळे अंतर्गत राजकारण प्रतिकूल झाले होते, आर्थिक समस्या आणि राजकीय अस्थिरतमुळे टोकाचा नागरी संघर्ष निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत पास्कल यांनी लिबेरियामध्ये युद्धोत्तर शांतता निर्माण करण्यासाठी गांधीवादाचा अवलंब केला.

आपल्या ‘अ रिंगसाइड सीट टू हिस्टरी’ या आत्मरचरित्रात त्यांनी या प्रयोगाचे सविस्तर वर्णन केले आहे. हे कार्य करण्यासाठी मिळालेल्या प्रेरणेचा उल्लेख करताना त्यांनी खूप मनोरंजक किस्साही नमूद केला आहे. आपल्या या कार्यामागे आदी शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाची प्रेरणा असून, डॉ. राधाकृष्णन यांच्या ‘ईस्टर्न रिलिजन अँड वेस्टर्न थॉट’ या पुस्तकातून हे शिकल्याचे पास्कल सांगतात. त्याचप्रमाणे गांधीजींच्या ‘व्ह्यूज ऑन हिंदू धर्म’ या पुस्तकाचा आपल्यावर प्रचंड प्रभाव असून, त्यातील विचाराने आपल्याला कायम दिशा दिली, असे ते अभिमानाने नमूद करतात. जन्माने रोमन कॅथलिक असूनही पेरूमध्ये त्यांची ओळख ही ‘रोमन कॅथलिक हिंदू’ अशी करून दिली जायची. पण, अद्वैत विचाराने प्रेरित झालेले पास्कल नंतरच्या काळात स्वतःला ‘रोमन कॅथॉलिक अद्वैतीयन’ असे संबोधू लागले.

सेवेत रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी परराष्ट्रमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांची भेट होणे आणि लिबेरियाच्या रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार म्हणून निवृत्त होणे या पास्कल यांच्या मते त्यांच्याआयुष्यातील दोन महत्त्वाच्या घटना आहेत. इतिहास आणि राजनय हे दोघे सख्खी भावंडे असून, दोघांनीच एकमेकांची काळजी घ्यायची असते, हा पं. नेहरूंनी दिलेला बहुमोल संदेश व लिबेरियासारख्या देशांना रक्तरंजित संघर्षावर गांधीवाद हाच शाश्वत उपाय असल्याचा झालेला साक्षात्कार या दोन मूल्यांवरच त्यांनी आपले पुढचे जीवन व्यतित केले. त्यातून म. गांधीवरील दोन पुस्तके तर जन्माला आलीच; शिवाय जागतिक राजकारणावर गांधीजींचा असणारा प्रभाव या शांतिदूतामुळे नव्याने अधोरेखित झाला.

(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments