Tuesday, October 6, 2026
Homeदेश-विदेशमदतीसाठी तरुणी ओरडत राहिली, मैत्रिणीच्या प्रियकरानेच कापला गळा; बंगळुरु PG मर्डर प्रकरणी...

मदतीसाठी तरुणी ओरडत राहिली, मैत्रिणीच्या प्रियकरानेच कापला गळा; बंगळुरु PG मर्डर प्रकरणी अटकेनंतर धक्कादायक खुलासे

[ad_1]

Bangalore Crime: बंगळुरुत  हॉस्टेलमध्ये घुसून एका 24 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, आरोपी अत्यंत निर्दयीपणे तिच्यावर चाकूने वार करत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, तो पीडित तरुणीच्या रुममेटचा प्रियकर आहे अशी माहिती मिळत आहे. 

आरोपी अभिषेक आणि त्याच्या प्रेयसीत नेहमी तो बेरोजगार असल्याने वाद होत होता. यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला होता. दोघांच्या या वादात अनेकदा पीडित तरुणी किर्ती कुमारीही पडत असे. यामुळे हा वाद आणखी टोकाला जात असे. मिळालेल्या माहितीनुसार, किर्ती कुमारीने तिच्या मैत्रिणीला अभिषेकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. 

यानंतर किर्ती आणि तिच्या मैत्रीणींनी अभिषेककडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी अभिषेक पीजी हॉस्टेलला आला आणि तिथे वाद घातला. यानंतर किर्ती कुमारीने तिच्या मैत्रिणीला नवीन पीजी हॉस्टेलमध्ये शिफ्ट होण्यासाठी मदत केली होती. तसंच दोघींनी अभिषेकचे कॉल उचलणंही बंद केलं होतं. यामुळे अभिषेकचा पारा चढला होता. याच संतापातून त्याने किर्ती कुमारीची हत्या केली. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिषेक किर्ती कुमारी राहत असलेल्या पीजी हॉस्टेलच्या कॉरिडोअरमध्ये चालत येताना दिसत आहे. किर्ती कुमारीच्या रुमजवळ तो जातो, तेव्हा त्याच्या हातात एक प्लास्टिकची पिशवीही दिसत आहे. अभिषेक दरवाजा ठोठावतो आणि नंतर आत जातो. यानंतर काही वेळाने अभिषेक किर्ती कुमारीला ओढत बाहेर आणतो. यावेळी किर्ती कुमारी त्याच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी धडपडत असते. 

अभिषेकच्या हातात यावेळी चाकू असतो. तो एका हाताने किर्तीचा गळा पकडतो. किर्ती चाकू लागू नये यासाठी प्रयत्न करत असते. पण अभिषेकला रोखण्यात ती अयशस्वी होते. अभिषेक तिला एकामागोमाग अनेक वेळा भोसकताना दिसत आहे. काही वेळाने किर्ती असहाय्य होते. यानंतरही अभिषेक तिच्यावर हल्ला सुरु ठेवतो. 

किर्ती खाली कोसळल्यानंतर अभिषेक तिचे केस पकडून पुन्हा एकदा भोसकतो. काही वेळाने तो मागे सरकून उभा राहतो. पण तिचा श्वास सुरु आहे पाहिल्यानंतर पुढे जाऊन गळा कापण्याचा प्रयत्न करतो. यानंतर अभिषेक तेथून पळ काढतो. यादरम्यान ती आरडाओरड करत मदतीसाठी याचना करत असते. पण भितीपोटी एकही तरुणी तिच्या मदतीसाठी पुढे येत नाही. काही वेळाने ती रक्तबंबाळ अवस्थेत बसलेली असते. यावेळी इतर मुली तिच्याकडे पाहून पोलिसांना फोन करतात.  



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments