Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशग्राहकांसाठी खुशखबर, ऐन लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; एक तोळ्याचे भाव जाणून घ्या!

ग्राहकांसाठी खुशखबर, ऐन लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; एक तोळ्याचे भाव जाणून घ्या!

[ad_1]

Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. त्यामुळं ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. 

आज वायदे बाजारात सोन्याच्या दरात 120 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 70,930 रुपयांवर पोहोचलं आहे. डॉलर वधारला असल्याने MCXवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. डॉलर मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 2627 डॉलरच्या आसपास ट्रेड करत आहेत. तर, चांदीच्या दरात 599 रुपयांची घट झाल्याने आज चांदी 87,081 रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करत आहे. 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा 70,930 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घट झाली असून 77,350 रुपयांवर स्थिरावलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रुपयांची घट होऊन 58,010 रुपयांवर प्रतितोळा सोनं स्थिरावलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  70, 930 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77, 350 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58, 010 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,093 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,735 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 801 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,744 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   61,880 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    46,408 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-70, 930 रुपये
24 कॅरेट- 77, 350 रुपये
18 कॅरेट- 58, 010 रुपये



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments