Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशऐका! मी आजारी आहे, लग्नाची वरात आणू शकत नाही; वराने रुग्णालयातून फोन...

ऐका! मी आजारी आहे, लग्नाची वरात आणू शकत नाही; वराने रुग्णालयातून फोन केला अन् पुढच्या क्षणी…

ऐका! मी आजारी आहे, लग्नाची वरात आणू शकत नाही; वराने रुग्णालयातून फोन केला अन् पुढच्या क्षणी…

[ad_1]

Viral News : लग्न हे वधू वरासोबत दोन्ही कुटुंबातील मिलनाचा एक सुंदर सोहळा असतो. सनई चौघडा वाजतो मांडव दारी, मंडप सजवला होता, वधू मेहंदीच्या हाताने भावी आयुष्याचे स्वप्न रंगत होती, घरात नातेवाईकांची धावपळ सर्वत्र आनंदाचं वातावरण पण काही क्षणात दारावर वर घोड्यावर येणार, सासूची स्वागतासाठी तयारी…पण एका फोननंतर घरातील वातावरणात दु:खाची लाट पसरली. नेमकं काय झालं जाणून घेऊयात. 

ऐका! मी आजारी आहे, लग्नाची वरात आणू शकत नाही…

लक्ष्मीचे लग्न रामनगर परिसरातील बिथोरा गावातील रहिवासी लवलेशसोबत ठरलं होतं. लग्नासाठी वडील अनेक दिवसांपासून तयार करत होते. लेकीला सासरी पाठवण्यासाठीचा तो क्षण जवळ आला होता. पण लवलेशचा अचानक फोन आला की, ऐका मी आजारी आहे, लग्नाची वरात आणू शकत नाही. रुग्णालयातून वराचा फोन आला आणि वडिलांसह वधूच्या चेहऱ्यावरील आनंदावर विरजन पडलं. लक्ष्मीच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांना सांगण्यात आले की वराची तब्येत बिघडली आहे. मुलीच्या बाजूचे लोक ताबडतोब रुग्णालयात पोहोचले, जिथे लव्हलेश बेडवर पडलेला आढळला. पण त्याची प्रकृती सामान्य होती, ज्यामुळे आजारपणाचे निमित्त करून लग्न पुढे ढकलण्यात आल्याचा संशय वधूच्या कुंटुबाला आला. (Viral News Groom calls bride I am sick I am canceling the wedding on the wedding day due to dowry demands)

लग्न मोडण्यामागे हे होतं खरं कारण…

कुटुंबातील सदस्यांना सांगितलं की, लग्नापूर्वी मुलाच्या कुटुंबाने एक लाख रुपये रोख आणि अपाचे बाईकची मागणी केली होती. लक्ष्मीचे वडील साहेब दीन म्हणाले की, ते गेल्या काही महिन्यांपासून लग्नाची तयारी करत होते. नातेवाईक येत-जात राहिले, जेवण आणि सजावटीवर पैसे खर्च होत होते. मुलीच्या हातावर मेहंदी लावण्यात आली होती, पण लग्नाची वरात आली नाही. 

वधूच्या कुटुंबाने रात्री पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पीआरबी पोलीस घटनास्थळी पोहोचले पण कोणताही उपाय सापडला नाही. आता साहब दीनचे कुटुंब न्यायासाठी याचना करत आहे. तीन बहिणींपैकी सर्वात लहान लक्ष्मीची स्वप्ने एकाच दिवसात भंगली. ही घटना आहे, बाराबंकी जिल्ह्यातील सिरौली गौसपूर भागातील कसरैलाडीह गावातील. महाराष्ट्रात वैष्णवी हगवणेचा हुंडाबळीमुळे सर्वत्र हादरला बसला आहे. अशातच बाराबंकीमधील या घटनामुळे अजून कधीपर्यंत हुंडाबळी होणार हा विचार कराला लावणारी गोष्ट आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments