Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशअश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची...

अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदत

[ad_1]

Brother Rapes Sister: रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये घडली आहे. येथील एका 13 वर्षीय मुलाने स्वत: च्या बहिणीवर बलात्कार करुन तिची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत मुलगी ही केवळ 9 वर्षांची असून तिची हत्या करणाऱ्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न तिच्याच घरच्यांनी केली. मध्य प्रदेशमधील रेवा येथे ही विचित्र घटना घडली आहे. या प्रकरणामध्ये मागील तीन महिन्यांमध्ये 50 हून अधिक डीएनए सॅम्पल घेतले आहेत. मृत मुलीच्या गुप्तांगामध्ये सापडलेले शुक्राणू हे तिच्या मोठ्या भावाच्या शुक्राणूंशी मॅच होत असल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.

तीन महिन्यांपासून लपवला गुन्हा

भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारं हे कृत करणाऱ्या 13 वर्षीय मुलाच्या कृत्याबद्दल त्याच्या आईला आणि दोन मोठ्या बहिणींना सारं काही ठाऊक होतं. मात्र या तिघीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी या मुलाबरोबरच त्याची आई आणि दोन्ही मोठ्या बहिणींना ताब्यात घेतलं आहे. ‘नयी दुनिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, हा संपूर्ण प्रकार रेवामधील जावा परिसरामध्ये तीन महिन्यांपूर्वी घडला. 

मोबाईलवर पाहत होता अश्लील व्हिडीओ

ज्या रात्री या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली त्या रात्री आरोपी मुलगा म्हणजेच तिचा भाऊ मोबाईलवर अश्लील व्हिडीओ (पॉर्न) पाहत होता. ते अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्यामधील कामूक भावानांना त्याला आवर घालता आला नाही आणि त्याने त्याच्या शेजारीच झोपलेल्या सख्ख्या बहिणीवर बालात्कार केला. या मुलीने तिच्याबरोबर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्याचे प्रयत्न करणाऱ्या मोठ्या भावाला विरोध करताना मी वडिलांना नाव सांगेन, असं म्हटलं. याच रागातून या मुलाने बहिणीला संपवलं. 

असा सापडला आरोपी

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यापासून या मृत मुलीला ओळखणाऱ्या 55 जणांच्या डीएनएचे नमुने घेतले. मात्र कोणाचाही डीएने मृत मुलीच्या शरीरावरील डीएनएबरोबर मॅच झाला नाही. कुटुंबाने पोलिसांवर बेजबाबदारपणा आणि आरोपीला शोधण्यास असमर्थ असल्याचे आरोप केले. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी मृत मुलीच्या भावाचे डीएनएचे नमुने घेतले असता ते नमुने मुलीच्या गुप्तांगातील शुक्राणूंमधील डीएनएबरोबर मॅच झाले. वैद्यकीय अहवालामध्ये मृत मुलीबरोबर हे घाणेरडं कृत्य तिच्या भावाने केल्याचं उघड झाल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. माझी बहीण बाजूला झोपलेली असताना मी मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहत होतो. माझं स्वत:वरील नियंत्रण सुटलं आणि मी तिचा बलात्कार केला, असा जबाब या मुलाने नोंदवला आहे. तिने सारं काही वडिलांना सांगण्याची धमकी दिली तेव्हा मी घाबरलो आणि तिला मारुन टाकलं, असंही तो म्हणाला.

आई आणि दोन्ही बहिणींना अटक

आरोपीने आपण जे काही केलं ते सारं आईला आणि दोन्ही मोठ्या बहिणींना सांगितलं होतं, अशी माहितीही पोलिसांना तपासादरम्यान दिली. या तिघींनी मिळून भावाला वडिलांपासून आणि पोलिसांपासून वाचवण्यासाठी संगनमताने बनाव करत तीन महिने तपासामध्ये अडथळा आणत खऱ्या आरोपीला लपवून ठेवलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चौघांना तुरुंगामध्ये ठेवलं आहे. पोलिसांनी या संपूर्ण घटनाक्रमाला दुजोरा दिला आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments