Saturday, September 12, 2026
Homeसातारासाथी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फलटण नगर पालिकेच्या वतीने शहरातील घरांचा...

साथी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फलटण नगर पालिकेच्या वतीने शहरातील घरांचा सर्व्हे ; -मुख्याधिकारी निखिल मोरे

फलटण :फलटण नगर परिषदेच्या वतीने कळविण्यात येत आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने फलटण शहर परिसरात दलदल निर्माण झालेली आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये या करिता फलटण नगर परिषद नागरी आरोग्य केंद्र मार्फत शहरातील घराचा सर्व्ह करणेत येत आहे. शहरातील एकूण-२८७१ घराचा सर्व्ह करणेत आलेला आहे त्यामध्ये ५२३४ कंटेनर तपासण्यात आलेले आहेत त्यामध्ये १२३ दूषित कंटेनर आढळून आलेले असल्याने सदरच्या घरातील असणारे पाणी साठे उदा. पाण्याचे हाऊद,बॅरल रिकामे करणेत आले व सदर ठिकाणी धुर फ़वारणी केलेली आहे आत्ता पर्यंत नगर परिषद हद्दीत एकून – ८ डेंगूचे रुग्ण आढळून आलेले आहेत.सदरच्या रोग़ाचा प्रादुर्भाव जादा पसरू नये या करिता नगर परिषदेच्या मार्फ़त विविध उपाय योजना करणेत येत आहेत यामध्ये धुर फ़वारणी करणे, गटर नाले स्वच्छता,कोरडा दिवस पाळणे तसेच शहरातील नागरीक़ामध्ये जनजागृती करणेसाठी पत्रके वाटप करणेत येत आहेत सदरच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता नागरीकांनी आपनाकड़े असनारे पाणी साठे वरचेवर रिकामे करावेत तसेच फ़्रिज वांरवार चेक़ करावेत इ. उपाय योजना करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments