Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशअखेर शोध लागला, देशांच्या नावाच्या शेवटी 'स्तान' का लावलं जातं? जाणून घ्या...

अखेर शोध लागला, देशांच्या नावाच्या शेवटी ‘स्तान’ का लावलं जातं? जाणून घ्या याचा अर्थ

अखेर शोध लागला, देशांच्या नावाच्या शेवटी ‘स्तान’ का लावलं जातं? जाणून घ्या याचा अर्थ

[ad_1]

Countries Names End With Stan : जगभरात अनेक देश आहेत, यातल्या यातल्या काही देशांच्या नावाच्या शेवटी ‘स्तान’ (Stan) शब्द लावला जातो. ज्या देशांच्या शेवटी स्तान लागतं, त्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, कझाकिस्तान या देशांचा समावेश होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का या देशांच्या शेवटी ‘स्तान’ का लावलं जातं. स्तान या शब्दाचा नेमका अर्थ काय? तुमच्या मनातही हे प्रश्न आले असतील तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सांगणार आहोत. स्तान या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि हा कोणत्या भाषेतला शब्द आहे.

स्तान या शब्दाचा अर्थ

सगळ्यात आधी स्तान या शब्दाचा अर्थ जाणून घेऊयात. सामान्य ज्ञानाशी संबंधित असलेली वेबसाईट ब्रिटॅनिकाने दिलेल्या माहितीनुसार ‘स्तान’ या शब्दाचा अर्थ आहे जमीन. ज्या जागेवर लोकं राहतात त्याच्याशी हा शब्द जोडला गेलेला आहे. वास्तविक ‘इस्तान’ किंवा ‘स्तान’ हा एक पर्शियन शब्द आहे.

यानुसार अफगाणिस्तानचा अर्थ आहे अफगाणि लोकांची जमीन. अफगाण नावापुढे ‘स्तान’ शब्द जोडल्याने या देशाचं नाव अफगाणिस्तान असं झालं आहे. हा शब्द इतका प्रसिद्ध झाला की काही देशांच्या नावात बदल न करता ‘स्तान’ हा शब्द जोडण्यात आला.

काही देशांच्या शेवटी ‘लँड’ शब्द ‘

स्तान’ प्रमाणेच काही देशांच्या शेवटी ‘लँड’ या शब्दाचा वाप केला जातो. उदा. इंग्लंड, नेदरलंड, स्वित्झरलँड, थायलँड, पोलँड असे अनेक देश आहेत. लँड हा इंग्रजी शब्द आहे, आणि याचा अर्थही जमीन असा होतो.

संस्कृत भाषेशी संबंध

भारतातील संस्कृत ही भाषा जगातील सर्वात पुरातन भाषा असल्याचं सांगितलं जातं. पुरातन काळात संस्कृत भाषेचा पुरावा सापडलाय. संस्कृत भाषेत अनेक शब्द आहेत, ज्यात इंग्लिश आणि अरबी शब्दांचा वापर केला गेला आहे. संस्कृतमधल्या ‘स्थान’ शब्दापासूनच ‘स्तान’ या शब्दाचा उगम झाल्याचं इतिहास सांगतो. स्थान या शब्दाचा अर्थ जमीन होतो.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments