मुलाला व्हिडिओ कॉल केला आणि वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारली! मुंबईतील बिझनेसमनच्या आत्महत्येनं खळबळ

0
28
मुलाला व्हिडिओ कॉल केला आणि वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारली! मुंबईतील बिझनेसमनच्या आत्महत्येनं खळबळ


मिळालेल्या माहितीनुसार, भावेश सेठ (वय, ५६) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भावेश हे घाटकोपर पश्चिमेतील रहिवासी असून त्याचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय होता. त्याच्यावर मोठे कर्ज होते, अशीही माहिती मिळत आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भावेश वांद्रे वरळी सी-लिंक येथे गेला. त्यानंतर त्याने आपला मुलगा स्मिथ सेठ (वय, २८) याला शेवटचा फोन केला आणि लगेच पाण्यात उडी मारली. सीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. मात्र, मच्छिमार समुदायाच्या स्थानिकांना सेठचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी पोलिसांची वाट न पाहता तात्काळ त्यांची मासेमारी बोट घेऊन बचाव मोहीम सुरू केली.



Source link