मंत्रीपदाच्या यादीत असलेलं माझं नाव का वगळलं ते कळलं नाही; सुधीर मुनगंटीवार

0
16
मंत्रीपदाच्या यादीत असलेलं माझं नाव का वगळलं ते कळलं नाही; सुधीर मुनगंटीवार


Sudhir Mungantiwar : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा रविवारी संध्याकाळी विस्तार करण्यात आला. अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपदाच्या यादीतून डच्चू देण्यात आला आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचे देखील नाव वगळण्यात आले आहे. यावर त्यांनी भाष्य केलं आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एक दिवसापूर्वी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव होते पण नंतर ते काढून टाकण्यात आले. मात्र, यामुळे ते नाराज किंवा निराश नाही. हा पक्षाच्या निर्णय असून तो मान्य आहे. मी संघटनात्मक कार्यकर्ता आहे असे देखील ते म्हणाले.



Source link