Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रप्रभाग क्रमांक १० मध्ये महिलांसाठी एसटी पास कॅम्पचे आयोजन

प्रभाग क्रमांक १० मध्ये महिलांसाठी एसटी पास कॅम्पचे आयोजन

प्रभाग क्रमांक १० मध्ये महिलांसाठी एसटी पास कॅम्पचे आयोजन

अकलूज प्रतिनिधी : अकलूज नगर परिषद येथील प्रभाग क्रमांक १० मधील महिलांसाठी आणि जेष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड व एसटी पास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक ८ जून २०२६ रोजी हा कॅम्प आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या गावचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील (बाबा ) तसेच नगराध्यक्षा रेश्मा ताई आडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या नगरसेविका मनिषाताई मोहन तिकोटे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कॅम्पमध्ये महिलांसाठी एसटी पास, एनसीएमसी स्मार्ट कार्ड तसेच संबंधित मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेषतः महिला व जेष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

संपर्कासाठी :
दादा तांबोळी, महेश शिंदे, संजय ताकतोडे, महिंद्रा गायकवाड, प्रशांत मोरे, सागर बनसोडे, विश्वास भोसले, महादेव भिंगारदिवे, गोटू गायकवाड, सागर काटे, जया लोंढे, मुसा, विनायक अवघडे, सद्दाम तांबोळी, पिनू पठाणा, निशांत जगताप, सनी वर्धम सर, भैया माडेकर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments