Friday, September 11, 2026
Homeसाताराकराडमध्ये अभियंत्याचा घातपात; पत्नी आणि मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

कराडमध्ये अभियंत्याचा घातपात; पत्नी आणि मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

कराडमध्ये अभियंत्याचा घातपात; पत्नी आणि मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

कराडमध्ये अभियंत्याचा घातपात; पत्नी आणि मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
कराड : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात घडलेल्या भीषण अपघाताच्या घटनेने खळबळ उडाली असून, हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे मृदू व जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मण मंडले यांचा कारखाली चिरडून खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाचच्या सुमारास कराड शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर लक्ष्मण मंडले यांना भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. एवढ्यावरच न थांबता चालकाने दोन वेळा त्यांच्या अंगावरून कार घातल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले आहे. त्यानंतर आरोपी चालकाने मंडले यांच्याकडील बॅग घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेत लक्ष्मण मंडले यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात की घातपात? असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या प्रकरणाचा छडा लावत ही हत्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी मंडले यांच्या पत्नी सुरेखा मंडले आणि मेहुणा संग्राम यांना ताब्यात घेतले असून, दोघांनी मिळून कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लक्ष्मण मंडले हे कराड तालुक्यातील मनव गावचे रहिवासी होते. त्यांनी महाबळेश्वर आणि कराड परिसरातही काम केले होते.
या घटनेमुळे कराडसह सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments