Sunday, August 16, 2026
Homeसातारावंचित बहुजन आघाडीचे साताऱ्यात महाराष्ट्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...

वंचित बहुजन आघाडीचे साताऱ्यात महाराष्ट्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

वंचित बहुजन आघाडीचे साताऱ्यात महाराष्ट्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सातारा | प्रतिनिधी. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पश्चिम विभागीय जिल्हाध्यक्ष अॅड. दयानंद माने यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र सरकारच्या विविध धोरणांविरोधात तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात आले.

यावेळी पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती, वाढती महागाई, स्मार्ट मीटरची सक्ती, तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेला विकास निधी इतरत्र वळवून संबंधित समाजघटकांना विकासापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या सर्व प्रश्नांवर सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, युवा आघाडीचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, सभासद, फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments