Uttarkashi Tunnel Rescue | रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात! बोगद्यातील खोदकाम पूर्ण, 17 दिवसांनी 41 कामगार बाहेर येणार | Navarashtra (नवराष्ट्र)

0
10
Uttarkashi Tunnel Rescue | रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात! बोगद्यातील खोदकाम पूर्ण, 17 दिवसांनी 41 कामगार बाहेर येणार | Navarashtra (नवराष्ट्र)

रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात! बोगद्यातील खोदकाम पूर्ण, 17 दिवसांनी 41 कामगार बाहेर येणार

गेल्या 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले आहेत. 12 नोव्हेंबरपासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. या मजुरांच्या सुटकेसाठी बोगद्यात 800 मिमी व्यासाची पाईप सोडण्यात आली. या पाईपमधून NDRF ची टीम मजुरांपर्यंत पोहोचली.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी) इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर आज सुटका होत आहे. NDRF च्या रेस्क्यू ऑपरेशनचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात (41 कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या. 41 मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. 41 मजुरांसाठी 41 बेड तयार करण्यात आले.

Source link