Friday, September 4, 2026
Homeसातारावाठार येथील निकृष्ट रेल्वे पूल दुरुस्तीसाठी वाहतूक बंद

वाठार येथील निकृष्ट रेल्वे पूल दुरुस्तीसाठी वाहतूक बंद

वाठार स्टेशन :- वाठार स्टेशन हद्दीतील काळी मोरी नावाच्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी उभारलेल्या नव्या पुलाचे काम निकृष्ट झाल्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे सातारा-लोणंद मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पुढील दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे, अशी अधिसूचना जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाने वाठारजवळील जुना पूल पाडून नवीन पूल बांधला होता. परंतु, कामाच्या गुणवत्तेतील कमतरतेमुळे पुलाची तात्काळ दुरुस्ती आवश्यक ठरली आहे. यामुळे रेल्वे महाव्यवस्थापकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पंधरा दिवसांकरिता वाहतूक बंद ठेवण्याबाबत सूचना केली होती. मात्र, वाहतुकीच्या सोयीचा विचार करून सोमवार ७ ते १६ ऑक्टोबरपर्यंत केवळ अवजड वाहतूक बंद राहील.

फलटण व लोणंद बाजूने येणारी अवजड वाहने खंडाळा/शिरवळ मार्गे पुणे-बंगळुरु महामार्गाने सातारकडे जाईल, तसेच साताराहून पुणे-बंगळुरु महामार्गाने खंडाळा/शिरवळ मार्गे लोणंदकडे मार्गक्रमण करतील. चारचाकी व दुचाकी वाहने आदर्की फाटा, तडवळे संमत वाघोलीमार्गे पिंपोडे बुद्रुकवरून वाठार मार्गे साताराकडे जातील.

वाहनधारकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाठार पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments