Monday, August 17, 2026
Homeसाताराकोळकी येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

कोळकी येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी


साहस Times :  त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त शाहू, फुले, आंबेडकर सभागृह, बुद्ध विहार कोळकी येथे त्यागमूर्ती माता रमाई महिला ग्रुप कोळकी व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक व धम्मकार्यक्रमांचे आयोजन करून जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास त्यागमूर्ती माता रमाई महिला ग्रुपच्या प्रवर्तक रजनी माने, ज्येष्ठ समाजसेविका कांताताई काकडे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख चित्रा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता काकडे यांच्यासह प्रियांका भोसले, अंकिता भोसले, अभिषा भोसले, दुर्गा भोसले, विद्या खंदारे, आरती पाटील, किर्ती माने, अक्षदा लोंढे, प्राजक्ता सागर काकडे, प्रजा बनसोडे, मयुरी काकडे, स्वाती जाधव, परिमिता कांबळे, कल्याणी सोनवणे, कन्याकुमारी कसबे, हर्षदा गौतम काकडे, बेबीनंदा रामचंद्र माने,अंकिता तानाजी भोसले, आरती विशाल पाटील,दुर्गा भोसले, प्रार्थना काकडे, सुधा जाधव, प्रियांका निकाळजे , आशा काकडे, छाया लोंढे आदी महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सर्वांच्या सहभागातून जयंतीचा कार्यक्रम हर्षोल्हासात पार पडला.

त्यागमूर्ती माता रमाई महिला ग्रुपच्या उभारणी व स्थापनेसाठी ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन व धम्मदेसना लाभली, त्या बुद्धपुत्र भंते काश्यपजी यांनी महिलांना त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच माता रमाई जयंतीनिमित्त मिळालेल्या धम्मदानातून सर्व उपस्थित उपासक-उपासिकांना धम्मदानातून फलाहार वाटप करून धम्मभावनेचे दर्शन घडविले.
नुकत्याच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित धम्मदीक्षा सोहळ्यात बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या अत्यंत धम्मशील माने कुटुंबीयांच्या रजनीताई माने यांनी स्वकमाईतून सर्व उपस्थित उपासक – उपासिका, बालक – बालिका यांना खीरदान करून कुशलकर्माचा पुण्यसंचय केला. यावेळी आरती पाटील व हर्षदा गौतम काकडे यांच्या मार्फत सर्वांना बिस्कीट पुड्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विक्रम दिलीप निकाळजे रा सोनगाव बंगला यांचे चिरंजीव पियुष विक्रम निकाळजे यांनी मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाठी व्यर्थ खर्च न घालवता भारतीय बौद्ध महासभेमार्फत प्रकाशित धम्मयान कॅलेंडरचे उपासक उपासिका यांना वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांताताई काकडे यांनी माता रमाई यांच्या त्याग, समर्पण, हालअपेष्टांमधून केलेली मेहनत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीत असलेले त्यांचे अमूल्य योगदान यावर सविस्तर मांडणी करत रमाईंच्या कार्याचा गौरव केला.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कार्यालय सचिव तथा बौद्धाचार्य आयु.चंद्रकांत मोहिते यांनी माता रमाईंच्या जीवनातील अनेक प्रसंग कथन करत उपस्थितांना भावनिक व मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले, “इतिहासात अनेक स्त्रियांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजावर ठसा उमटवला; मात्र अत्यंत हालअपेष्टा सहन करून संपूर्ण कुटुंबाचा भार वाहत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी मदत केली.त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सावली बनलेली रमाई ही सर्वांहून वेगळी आहे. रमाईंचा त्याग, समर्पण व सेवाभावी वृत्ती आजच्या माताभगिनींसाठी आदर्श आहे.” राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता भिमाई यांच्यासोबत माता रमाई यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.सचिन रोकडे, सतीश भोसले जाधववाडी यांनी ही मनोगत व्यक्त केले.

संपूर्ण कार्यक्रम धम्ममय वातावरणात, सामाजिक एकतेचा संदेश देत यशस्वीपणे पार पडला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments