Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रएन. रघुरामन यांचा कॉलम: सोन्याच्या शर्यतीत अद्याप पैसे कमावता येतील का?

एन. रघुरामन यांचा कॉलम: सोन्याच्या शर्यतीत अद्याप पैसे कमावता येतील का?

एन. रघुरामन यांचा कॉलम:  सोन्याच्या शर्यतीत अद्याप पैसे कमावता येतील का?

[ad_1]


जर तुम्ही चार दिवस आधी, 4 फेब्रुवारीला सोने खरेदी केले असते तर तुम्ही 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी अंदाजे ₹1,60,356 दिले असते, जे 1 फेब्रुवारी 2026 पेक्षा ₹3,505 जास्त आहे. तुम्ही एक वर्षापूर्वी हीच खरेदी केली असती तर व्यवहाराची किंमत सुमारे ₹85,300 झाली असती. फेब्रुवारी 2024 च्या या स्तंभात पुढील 14 महिन्यांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती तेव्हा एवढे सोने तुम्हाला 62 हजार रुपयांत मिळाले असते. सोने विक्रमी उच्चांकावर असू शकते. जागतिक अनिश्चिततेच्या काळात ते आणखी वाढू शकते. कारण जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ते पसंतीचा पर्याय आहे. परंतु ज्या गुंतवणुकींनी इतकी चांगली कामगिरी केली आहे त्यात अनेकदा अशा व्यवहारांचा समावेश असतो, ज्यात सुधारणा होऊ शकते. म्हणूनच जगभरातील मध्यवर्ती बँकांना जोडणाऱ्या बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सने इशारा जारी केला आहे. त्यानुसार सोने बबल झोनमध्ये असू शकते आणि त्यात लक्षणीय घटदेखील होऊ शकते. तथापि, अनेक गुंतवणूकदार आणि विश्लेषक अजूनही असे सुचवत आहेत की, ते आणखी वाढेल. यासाठी प्रत्येकाची स्वतःची कारणे आहेत. पण जेव्हा आपण चांदीकडे पाहतो तेव्हा ती अत्यंत अस्थिर झाली आहे, त्यात लक्षणीय चढउतार येत आहेत. अनेक महिन्यांच्या वाढीनंतर अलीकडेच एका दिवसात ती 17% ने घसरली आहे. एका आठवड्यात ती सर्वोच्च शिखरावरून ती 36% ने घसरली आहे. उच्च परताव्याची आशा बाळगून गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती, सोन्याच्या तुलनेत तिचा आकार लहान असणे आणि औद्योगिक मागणी यामुळे चांदीच्या किमतीत एका वर्षात 250% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. बहुतेक भारतीयांसाठी सोन्यातील गुंतवणूक हा एक भावनिक विषय आहे. दुसरीकडे, जगभरातील अनेक लोक याकडे एक ‘अंतिम सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून पाहतात. ते सोन्याकडे त्याच दृष्टीने बघतात, ज्याप्रमाणे मोठे गुंतवणूकदार शेअर आणि बाँड्सकडे पाहतात. परंतु जर तुम्ही नफा मिळवण्याचा विचार करत असाल तर त्याची अस्थिरता आणि किमतीत घट यामुळे लक्षणीय नुकसान होऊ शकते. म्हणून गुंतवणूक करताना एक मर्यादा निश्चित करा : तुम्ही कोणत्या किमतीला नफा मिळवण्यासाठी पुरेशा उच्च किमतीला विक्री कराल किंवा कोणत्या किमतीला इतक्या कमी किमतीला विक्री कराल की तोटा सहन करता येईल. व्यवस्थापनाची टीप : खरेदीसाठी खूप उशीर झाला आहे आणि तुम्ही ते विकत घेतले तरी त्यासोबत कोणतीही भावना जोडू नका. तुम्ही स्वतः ठरवून दिलेल्या मर्यादेनुसारच त्याचा व्यापार (ट्रेडिंग) करा. तज्ज्ञांसह कोणाचेही अंदाज चुकू शकतात, हाच आमचा इशारा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments