Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशTerrorist Attack In Jammu KAshmir | मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी...

Terrorist Attack In Jammu KAshmir | मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, जीवितहानी नाही; चकमक सुरू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, जीवितहानी नाही; चकमक सुरू

काश्मीरमधील पुंछ भागात हा हल्ला झाला. दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने जबाबदारी स्वीकारली आणि प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला.

नवीन वर्ष सुरू दुसरा आठवठा होत नाही तोच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. सध्या जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समरो येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला (Terrorist Attack In Jammu Kashmir) केला आहे. काश्मीरमधील पुंछ भागात हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल लष्कराने गोळीबार सुरू केला. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हे सुद्धा वाचा

पुंछमध्ये लष्कराचे अधिकारी असताना हल्ला

शुक्रवारी पुंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर अचानक हल्ला केला. यानंतर जवानांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. प्राथमिक गोळीबारानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले, ज्यात जवळच्या टेकडीवरून गोळ्या झाडल्या गेल्या. हल्ला झालेल्या लष्कराच्या ताफ्यात अनेक वाहनांचा समावेश होता. हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी रणनीती आखण्यासाठी पुंछमध्ये आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments