Swatantrya Veer Savarkar Trailer: रणदीप हुड्डाचं मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन! ‘सावरकर’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिला?

0
20
Swatantrya Veer Savarkar Trailer: रणदीप हुड्डाचं मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन! ‘सावरकर’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिला?


‘भारताला स्वातंत्र्य अहिंसेनेच मिळाले हे आपण सर्वांनीच वाचले आहे. पण ही त्याची कथा नाही’, रणदीप हुड्डाच्या आवाजात याच डायलॉगने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. सावरकरांनी अखंड भारतासाठी कसा संघर्ष केला, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यांनी भारताला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आपले सैन्य कसे उभे केले आणि इंग्रजांना भारतातून हाकलण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले, हे या कथेतून दाखवण्यात येणार आहे. आपल्या क्रांतिकारी वर्तनामुळे सावरकरांना इंग्रजांचाही जुलूम सहन करावा लागला. त्यांना दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तरीही सावरकरांनी हार मानली नाही आणि आपला लढा सुरूच ठेवला.



Source link